शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
3
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
4
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
5
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
6
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
7
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
8
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
9
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
10
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
11
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
12
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
13
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
14
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..
15
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
16
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
17
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
18
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
19
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
20
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा

Maratha Reservation News : आता सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 1:04 PM

Maratha Reservation: will not back down even if they shoot; Manoj Jarange Patal's warning to government अंतरवालीसारखा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. कोट्यवधी मराठा एकत्र आलाय त्यामुळे ते सरकारला जड जाईल असा इशारा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. 

छत्रपती संभाजीनगर - Manoj Jarange Patil on Maratha Reservation ( Marathi News ) सरकारच्या डोक्यात जे आहे, ते सरकार करतंय. जनतेच्या मनातलं सरकार करत नाही. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याची आमची भूमिका आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे असे लाखो पुरावे आहेत. मग कशाला आम्हाला फुफाट्यात ढकलताय? मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या सरसकट समाजाला ओबीसीतील हक्काचे आमचे आरक्षण द्यावे. सरकार धरसोड करतंय. सरकार आरक्षण देईल वाटत नसल्याने आम्ही मुंबईला चाललोय. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही. मराठा समाज इतका घरातून बाहेर पडणार आहे की, गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे म्हणाले की, मुंबईला गेल्यावर आता माघारी नाही. मी जे जे बोललो ते केले आहे. मी माझ्या समाजासाठी पूर्ण ताकद पणाला लावायची माझी तयारी आहे.वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालेल. जर ही संधी गेली तर मराठा पोरांचे खूप हाल होणार आहेत. आरक्षण मिळाले नाही तर भविष्यात खूप नुकसान होणार आहे. मराठ्यांनी सावध व्हा, सर्वांनी घरे सोडा. आज केले नाही तर कधीच होणार नाही. नाईलाज असल्याने आम्हाला मुंबईला यावे लागणार आहे. मराठ्यांनो घरी बसू नका. आपल्या लेकरांसाठी आरक्षण घ्यायचे आहे. २० तारखेपासून अंतरवालीतून पायी निघायचे आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतायचे नाही असं आवाहन त्यांनी केले. 

त्याचसोबत प्रकाश शेंडगे ज्येष्ठ नेते त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागतोय. शेंडगेंनी गोरगरीब धनगरांना आरक्षण मिळावे यासाठी शक्ती पणाला लावावी. मराठा समाजही त्यांच्यासोबत आहे. विनाकारण त्यांनी शक्ती वाया घालवू नये. ते चळवळीतून आलेले नेते आहेत. त्यांच्याविषयी आणखी काय बोलणार नाही अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली आहे. 

गृहमंत्री फडणवीसांना इशारा

मराठा समाजाने ठरवलंय, आपण आहोत तोपर्यंत लेकरांना आरक्षण मिळवून द्यायचे. सरकारला काय करायचे ते करावे. गुन्हे दाखल करून सरकारला नरेंद्र मोदींकडून पाठ थोपटून घ्यायची असेल. येडपाटाचे ऐकायचे म्हणून सरकार हे करतंय. सरकारनं शहाणे व्हावे. मराठ्यांशिवाय काही होऊ शकत नाही हे सरकारनं समजून घ्यावे. जर खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाज दबला असता तर बीडमध्ये लाखोंचा जनसागर उसळला नसता. विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाची नाराजी देवेंद्र फडणवीसांनी ओढावून घेऊ नका. कोणतेही ट्रॅक्टर रोखू नका. अंतरवालीसारखा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. कोट्यवधी मराठा एकत्र आलाय त्यामुळे ते सरकारला जड जाईल असा इशारा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. 

दरम्यान, मी पण हिंदू आहेच. मराठा आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे. राम मंदिराचे उद्घाटन त्यावेळी आहे. हा प्रत्येकाच्या आनंदाचा सोहळा आहे. १८ तारखेपर्यंत मुंबईत १४४ लागू आहे त्यामुळे २० जानेवारीला मुंबईत जाणार हे घोषित केले. २० तारीख केवळ सरकार ५ महिने आरक्षण लांबवत आहे म्हणून धरली आहे असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील