शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

अहमदनगरमध्ये मराठा समाजाचा महामोर्चा

By admin | Published: September 24, 2016 3:49 AM

कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशी द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा

अहमदनगर : कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशी द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, या आणि इतर मागण्यांसाठी आजवरच्या गर्दीचे उच्चांक मोडणारा विराट असा मूक मोर्चा शुक्रवारी नगरमध्ये सकल मराठा समाजाने काढला. पावसाचे वातावरण असतानाही अवघा समाज या मोर्चासाठी एकवटला होता. कोपर्डी अत्याचाराची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आणि याच घटनेमुळे राज्यात सकल मराठा समाजाच्या मोर्चांची मालिका सुरू झाल्यामुळे येथील मोर्चाबाबत सर्वांना उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे हा मोर्चा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. उत्स्फूर्तपणे सहकुटुंब माणसे मोर्चात उतरली होती. नगर शहरात रात्रीपासूनच पावसाचे वातावरण होते. पण त्याची तमा न बाळगता पहाटेपासूनच मोर्चेकरी शहरात दाखल झाले. शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुल तुडुंब भरले होते. तेथून मोर्चाचे व्यासपीठ असलेला चांदणी चौकापर्यंतचा रस्ता तसेच शहरातून जाणारे सातही महामार्ग गर्दीने व्यापले होते. या प्रत्येक महामार्गावर आठ किलोमीटरच्या परिसरापर्यंत मोर्चेकरी होते. लाखो लोकांना नगर शहरात प्रवेशही करता आला नाही. शहरातील अंतर्गत रस्तेही गर्दीने व्यापले होते. त्यामुळे शहर सकाळपासून अक्षरश: थांबून गेले होते. सर्वत्र भगवे ध्वज, ‘मराठा क्रांती’च्या पांढऱ्या टोप्या व ‘एक मराठा-लाख मराठा’ असे फलक होते. कुठलीही घोषणा न देता शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा निघाला. स्वयंसेवकांनी अत्यंत नियोजनपूर्वक गर्दी नियंत्रित केली. पोलिसांना काहीही हस्तक्षेप करावा लागला नाही. मोर्चात ज्येष्ठांसह, महिला व तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय होती. मोर्चेकऱ्यांच्या वतीने किरण गव्हाणे, लोकिता साठे, सायली चितळे, सिद्धी शिंदे, ऋषाली कोहोक, अनुराधा बेरड, ऐश्वर्या अजबे, माधवी काकडे या आठ मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर मोर्चाच्या व्यासपीठावर संस्कृती वाघस्कर, आदिती दुसुंगे, राधा पवार, वैष्णवी मोकाने, विद्या कांडेकर, जयश्री कवडे, अश्विनी जगदाळे या मुलींनी आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी, कोपर्डी अत्याचार, शेतकरी आत्महत्या या विषयांवर आक्रमक भाषणे करून मागण्या मांडल्या. भाषणांपूर्वी कोपर्डीतील अत्याचारित मुलगी व उरी येथील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पावणेएक वाजता राष्ट्रगीताने मोर्चा विसर्जित झाला. त्यानंतर शहरातील गर्दी ओसरून महामार्ग सुरळीत होण्यासाठी तीन तास लागले. (प्रतिनिधी)>नेते वाडिया पार्कात बसूनमोर्चासाठी विरोधी पक्षनेते, माजी महसूलमंत्री, आजी-माजी मराठा आमदार सकाळी सात वाजताच शहरात दाखल झाले. मोर्चात महिला अग्रभागी, नंतर सामान्य माणसे व सर्वात शेवटी नेते असे धोरण ठरलेले होते. मात्र, गर्दीच एवढी होती की नेत्यांना वाडिया पार्क या क्रीडा संकुलातून बाहेरच पडणे शक्य झाले नाही. पीडित मुलीच्या कुटुंबाचा सहभाग कोपर्डी येथील पीडित मुलीचे वडील, सरपंच तसेच ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते. ते कोपर्डीहून मशाल घेऊन आले होते. ‘घटनेनंतर राज्यातील सर्व मराठा समाज आपल्या पाठीशी उभा राहिला त्याबद्दल आपण आभारी आहोत. अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी व्हावी अशी आपली मागणी आहे. मात्र, पोलिसांनी अद्यापही आरोपपत्र दाखल केलेले नाही, अशी खंत पीडित मुलीच्या वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.>शहरात दिवसभरचारचाकी वाहनच नाही नगर शहर हे राज्याच्या मध्यवर्ती आहे. पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कल्याण, दौंड, बीड, शिर्डी अशा सर्व बाजूने येणारी वाहतूक मोर्चामुळे बाह्यवळण रस्त्यांनी वळविण्यात आली होती. त्यामुळे पहाटेपासून दुपारी चार वाजेपर्यंत अशी सुमारे दहा तास एकही एसटी अथवा मालमोटार शहरातून धावू शकली नाही. तीनही बसस्थानकांवर अक्षरश: शुकशुकाट होता. असे शहराच्या इतिहासात प्रथमच घडले.