शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

मराठा तरुणांना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या एकाच क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 3:57 PM

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांना सर्वप्रथम १० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे

मुंबई - केवळ नोकरीवर अवलंबून न राहता, तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि त्याकरिता त्यांना विनासायास अर्थसाहाय्य मिळावे, याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे १० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची योजना जाहीर झालेली आहे. व्यवसायासाठी इच्छुक तरुणांना या योजनेचा मोठा लाभ मिळू शकतो.

शासनाच्या या कर्ज योजनेमुळे मराठी तरुणांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.काय आहे योजना ?ही योजना मराठा समाजातील तरुणांसाठी आहे. या योजनेकरिता १० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम तरुणांना व्यवसायासाठी कर्जापोटी प्राप्त होईल. विशेष म्हणजे, या योजनेकरिता देण्यात येणाऱ्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. बिनव्याजी अशी ही कर्ज योजना आहे.

आधी दहा हजार, ५० हजार, नंतर १ लाखया योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांना सर्वप्रथम १० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. कर्जापोटी देण्यात येणाऱ्या रकमेचा विनियोग त्यांनी कसा केला आहे, हे तपासतानाच त्या कर्जाची परतफेड नियमित केली असेल तर पुढच्या टप्प्यांत त्यांना ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम कर्जापोटी प्राप्त होऊ शकेल. या ५० हजार रुपयांच्या कर्जाचीदेखील नियमित कर्जफेड केली तर त्यापुढील टप्प्यांत या तरुणांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्जापोटी मिळू शकेल.

परतफेड प्रतिदिन १० रुपयेजेव्हा तरुणांना सर्वप्रथम १० हजार रुपयांचे • कर्ज मिळेल, तेव्हा या कर्जाची परतफेड प्रति दिन १० रुपये याप्रमाणे करावी लागेल. कर्जाची मर्यादा १० हजारांवरून वाढून जेव्हा ५० हजार रुपये इतकी होईल, त्यावेळी या तरुणांना कर्जाची परतफेड प्रतिदिन ५० रुपये याप्रमाणे करावी लागेल.

१) ५० हजार रुपयांवरून जेव्हा कर्जाची मर्यादा ३ एक लाख रुपये इतकी वाढेल, त्यावेळी कर्जाची परतफेड करताना या तरुणांना प्रतिदिन १०० रुपये याप्रमाणे परतफेड करावी लागेल. वयोमर्यादा ६० वर्षे करण्यात आलेली आहे.

अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आधार कार्डरहिवासी पुरावाउत्पन्नाचे प्रमाणपत्रजातीचे प्रमाणपत्र

अर्ज कुठे करायचा? - या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल.

टॅग्स :marathaमराठा