शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
2
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
3
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
4
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
5
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
6
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
7
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
8
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
9
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
10
देशातील सर्वात मोठ्या IPO ला SEBI चा हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी येणार Hyundai Motors च्या इश्यू
11
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
12
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?
13
मविआतील पक्षांना अक्षय शिंदेचा पुळका आलाय; भाजपाचा घणाघात, उद्धव ठाकरेंवरही टीका
14
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
15
सुनावणीवेळी भरकोर्टात असं काय घडलं..? न्यायाधीश बोलले, "कलियुग आलंय असं वाटतंय"
16
Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
17
डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील...
18
पंडित जसराज यांची पत्नी मधुरा जसराज यांचे निधन, ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
धक्कादायक! घरमालकाने UPSC ची तयारी करणाऱ्या महिलेचा बनवला अश्लील Video, असा झाला खुलासा
20
स्मिथचा एकदम परफेक्ट पुल शॉट! पण Brydon Carse च्या अप्रतिम झेलमुळं खेळच खल्लास (VIDEO)

मराठी चित्रपट संग्रहालय उभारणार

By admin | Published: May 01, 2015 1:03 AM

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य योगदान दिले आहे.

पुणे : चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांचे कर्तृत्व मोठे असले तरी घर विकून त्यांच्या कार्याला हातभार लावणा-या त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई फाळके यांचाही त्यात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या धर्तीवरच त्यांच्या नावाने मराठी चित्रपट संग्रहालय उभारण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी गुरूवारी केली.राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयच्या वतीने गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ५२ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे,सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक अजय आंबेकर उपस्थित होते. तावडे यांनी दुर्मिळ मराठी चित्रपट,कथा,पटकथा, साहित्य असा चित्रपटांशी संबंधितअनमोल ठेवा जतन होण्याच्या दृष्टीने अशाप्रकारचे संग्रहालय निर्मित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कार,ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांना राजकपूर जीवनगौरव पुरस्कार तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि ज्येष्ठ छायाचित्रकार सूर्यकांत लवांदे यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सिनेसंग्राहक नारायण फडके यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राची लाडकी लेक झाले : विद्या बालनशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कारामुळे मी महाराष्ट्राची लाडकी लेक झाले आहे. मुंबइत लहानाची मोठी झाले त्यामुळे मराठी सिनेमाची आवड होतीच. यापूर्वी मी एका हिंदी चित्रपटात मराठी लावणी केली आहे. आता एक मराठी चित्रपट करणार असून त्या चित्रपटासाठी पुरस्कार मला मिळवायचा आहे, अशी इच्छा प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांनी व्यक्त केली. आता आत्मपरिक्षण करण्याची गरजआयुष्यातील पहिला पुरस्कार राज्य शासनातर्फे ’मुक्ता’या चित्रपटासाठी मिळाला. आता थोडेसे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे या पुरस्काराने सुचित केले असल्याचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले.‘लोकमत’चा कार्यक्रम माझ्यासाठी लकी‘गणवेश’ या आगामी चित्रपटावर ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘गप्पाटप्पां’मध्ये सायंकाळी दिलीप प्रभावळकर सहभागी झाले होते. कार्यक्रम सुरू असतानाच प्रभावळकर यांना सर्वोत्कृष्ठ विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. उपस्थित श्रोत्यांना कार्यक्रमातच ही बातमी देताना प्रभावळकर म्हणाले, ‘‘लोकमतचा कार्यक्रम माझ्यासाठी लकी ठरला. त्याचबरोबर लोकमतसोबत असलेल्या ‘मस्त पुणे’ टीममधील खेळाडू श्रुती मराठे यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार्थी४सर्वोत्कृष्ठ कलादिग्दर्शन : हॅप्पी जर्नी ४सर्वोत्कृष्ठ छायाचित्रण :नागरिक४सर्वोत्कृष्ठ संकलन : हॅप्पी जर्नी ४सर्वोत्कृष्ठ ध्वनिमुद्रण :हॅप्पी जर्नी४सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेता : संदीप पाठक (एक हजाराची नोट)४सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्री : श्रृती मराठे (रमा माधव)४सर्वोत्कृष्ठ विनोदी अभिनेता : दिलीप प्रभावळकर (पोश्टर बॉइज)४सर्वोत्कृष्ठ विनोदी अभिनेत्री :वर्षा उसगावकर (हतूतू)४सर्वोत्कृष्ठ बालकलाकार : आशुतोष गायकवाड (काकण)४सर्वोत्कृष्ठ कथा :मधुगंधा कुलकर्णी (एलिझाबेथ एकादशी)४सर्वोत्कृष्ठ पटकथा : मधुगंधा कुलकर्णी (एलिझाबेथ एकादशी)४सर्वोत्कृष्ठ संवाद :महेश केळुस्कर (नागरिक)४सर्वोत्कृष्ठ गीत :शाहीर संभाजी भगत (नागरिक)