मुंबई : मराठीत काहीही निर्माण करायचे म्हणजे सतत अंथरुण पाहून पाय पसरायची वेळ... कायम आपले ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात अशी भागवाभागवी करून आपली (आणि दृश्य-मनोरंजनाच्या पुरात बुडून अजिबात म्हणून वाचनाच्या वाऱ्याला न फिरकणाऱ्या वाचकांची) हौस भागवायची, या समजुतीला पहिला धक्का देत एक लाख प्रतींच्या खपाचा उंबरठा ओलांडणारा दीपोत्सव हा ‘लोकमत’चा दिवाळी अंक! दीपोत्सव २०१४च्या अंकासाठी आॅडिट ब्यूरो आॅफ सर्क्युलेशनने १ लाख १ हजार १६७ प्रतींची विक्री झाल्याचे प्रमाणपत्र देऊन या नेत्रदीपक यशावर अधिकृततेची मोहर उमटवली आहे.हे प्रमाणपत्र ‘लोकमत’ वृत्तसमूहाला नुकतेच प्राप्त झाले.प्रयोगशीलतेचा सन्मानसंपादन, वितरण आणि विपणन या प्रत्येक क्षेत्रात माझ्या सहकाऱ्यांनी कष्टपूर्वक सिद्ध केलेल्या प्रयोगशीलतेला मिळालेले हे यश आहे, असे मी मानतो. येत्या वर्षी याहीपुढला टप्पा ‘दीपोत्सव’ने गाठावा यासाठी ‘लोकमत’ प्रयत्नांमध्ये कोणतीही कसूर ठेवणार नाही. आमच्या या प्रयोगशीलतेला भरभरून दाद देणाऱ्या वाचकांचे मन:पूर्वक आभार.- विजय दर्डा, अध्यक्ष, लोकमत वृत्तपत्र समूहनवनव्या विचारप्रवाहांबद्दल सजग झालेला बदलत्या जाणिवांचा मराठी वाचक, त्याचे बदललेले व्यक्तिमत्त्व ही ‘दीपोत्सव’च्या यशामागची मुख्य प्रेरणा आहे आणि तेच कारणही! याही वर्षाची दिवाळी अशी ‘चौकटीपलीकडची’ ठरावी, यासाठीच्या प्रयत्नांना अधिकचे बळ मिळाले आहे!- अपर्णा वेलणकर,संपादक, दीपोत्सव
मराठी दिवाळी अंकांच्या इतिहासातील ‘लाखाची पहिली गोष्ट’
By admin | Published: August 25, 2015 2:36 AM