नम्रता फडणीस, पुणेएकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने भरारी घेतल्याने भाषेशी निगडीत अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग करणे आता शक्य झाले आहे. आज मोबाईलमध्ये मराठी फॉण्टचे अॅप्लिकेशन डाऊनलाऊड केले तर एका झटक्यात मराठीत कोणताही शब्द टाईप करता येऊ शकतो. इतकी तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. मराठीप्रेमींसाठी ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट असली तरी घरच्या संगणकापासून अद्यापही ‘माय मराठी’ काही अंशी दूरच आहे. घरचा संगणकही मराठी ‘फ्रेंडली’ होण्याकरिता राज्य शासनाने माहितीपट निर्मितीच्या दिशेने पावले उचलली आहेत.इंग्रजीच्या बोलबाल्यामध्ये मराठीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत, अशी वारंवार ओरड केली जाते. मराठी ज्ञानव्यवहाराची भाषा नसल्यामुळे तरूणवर्गही मराठीकडे पाठ फिरवित आहेत. या संदर्भात शासनानेच ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची अपेक्षा भाषाप्रेमी, अभ्यासकांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे शासनस्तरावरही विविध प्रकल्पांच्या माध्यमातून मराठी भाषेला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.येत्या २७ फेब्रुवारीला ‘भाषा दिन’ साजरा होत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल तेव्हा मिळेल, पण ‘मायमराठी’ला ज्ञानव्यवहारासह तंत्रज्ञानाची भाषा म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. ‘जे बोलाल ते टाईप होईल’, अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर तयार करण्याबरोबरच घरच्या संगणकावर मराठीचे बोल पोहोचविण्यासाठी ‘संगणक आणि मराठी’ या शीर्षकांतर्गत माहितीपट तयार करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
संगणकासाठी मराठी ‘फ्रेंडली’
By admin | Published: February 06, 2017 5:56 AM