पुणो : अमराठी भाषिकांना मराठी शिकता यावी यासाठी पुणो विद्यापीठातील मराठी विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागाने अमराठी विद्याथ्र्यासाठी मराठीचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला कोणीही अमराठी भाषिक प्रवेश घेऊ शकतो.
पुणो विद्यापीठ तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी परराज्यांतील तसेच परदेशातून आलेले आहेत. त्यांना मराठीचा कसलाही गंध नसतो. मात्र, मराठी शिकण्याची इच्छा असते. तसेच, पुण्यात अनेक अमराठी भाषिक नागरिक आहेत. त्यांनाही मराठी बोलता, वाचता यावे, अशी इच्छा असते. या सर्वासाठी हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
आठवडय़ातून दोन दिवस याचे वर्ग घेतले जातील. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी 17 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. दरम्यान, अभ्यासक्रमामध्ये विद्याथ्र्याना मुळाक्षरांपासून ते शब्द, वाक्य तयार करणो असे पायाभूत शिक्षण दिले जाईल. तसेच वाचन, लेखन, सार्वजनिक ठिकाणांना भेटी, लोकांशी संवाद साधणो, मराठी चित्रपट, गाण्यांचा आस्वाद घेणो या गोष्टींचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
यंदा चांगला प्रतिसाद मिळेल.
4याविषयी अधिक माहिती देताना अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. अविनाश आवलगावकर म्हणाले, मराठी विभागाने मागील वर्षी हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. केवळ पाच जणांनी प्रवेश घेतला होता. या वर्षी चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. प्रवेशासाठी कसलीही अट नसल्याने कोणीही प्रवेश घेऊ शकतो.