शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

बोलीभाषांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 3:24 PM

देशातील अनेक बोलीभाषा लुप्त होण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील बोलीभाषांचे संवर्धन व्हावे यासाठी राज्यातील शिक्षकांनी पुढाकार घेतला ....

मुंबई - देशातील अनेक बोलीभाषा लुप्त होण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील बोलीभाषांचे संवर्धन व्हावे यासाठी राज्यातील शिक्षकांनी पुढाकार घेतला असून बोलीभाषांच्या जतनासाठी प्रकल्प हाती घेतला असल्याचे मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी सांगितले.

मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातून निरनिराळ्या बोलीभाषांचा परिचय होण्यासाठी बोर्डाने व बालभारतीने काही निवडक बोलीभाषेतील उतारे अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत. त्याअनुषंगाने इतर ही काही बोलीभाषा आहेत. कदाचित काही काळांनी या बोली भाषा लुप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी त्या त्या बोलीभाषेतील म्हणी, उखाणे, पोवाडे, ओव्या, अभंग, लोकगीते, पाळणे, काही महत्त्वाचे निवडक शब्द, स्वागत करण्याच्या पद्धतीचे संकलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाने संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला असून राज्यातील शिक्षकांना अध्यापक संघाच्या त्रैमासिकातुन आवाहन करण्यात आले आहे.राज्यातील विविध भागांतील जिल्ह्यातील विविध शाळांमधून अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या मदतीने याचे संकलन होणार असून त्यासाठी फॉर्म तयार करण्यात आला आहे. यामध्ये बोलीभाषेचे नाव, बोलीभाषेतील म्हणी, उखाणे, ओव्या, पाळणे, लोकगीते, अभंग, पोवाडे, बोलीभाषेतील नेहमीच्या व्यवहारातील ५० शब्द, उतारे, बोलीभाषेतील शेती विषयातील शब्द, शालेय जीवनाशी निगडित शब्द, सणांची, अन्नपदार्थांची नावे या मुद्यांवर शिक्षक आपल्या परिसरातून माहिती संकलित करणार आहेत. यावर एक पुस्तिका बनविली जाणार असून शिक्षक संघाच्या जून व सप्टेंबर च्या अंकातून प्रसिद्धीही दिली जाणार असल्याचे मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी सांगितले

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018marathiमराठी