शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

मराठी माणूस जिंकतोय की हरतोय?

By admin | Published: February 27, 2017 1:10 PM

एकूण २२७ नगरसेवकांपैकी ५५ ते ६० नगरसेवक परप्रांतीय? म्हणजे २५% हून जास्त परप्रांतीय नगरसेवक? मनात एकच प्रश्न आला कि आम्ही जिंकतोय कि हरतोय?

पुष्कराज चव्हाण
 
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच पार पडली. निवडणुकीचा निकाल २३ फेब्रुवारी २०१७ रोजी जाहीर झाला आणि त्यादरम्यान उडालेला धुरळा आताशी कुठे निवतोय. आता सत्ता समीकरणं जुळवण्यात सर्वपक्षीय मंडळी गुंतलेली असताना समाज माध्यमांवर आजही मार्मिक किस्से, चुटकुले आणि कोपरखळ्यांच्या संदेशांची देवाण घेवाण चालूच आहे. यातच एक संदेश विचारांना चालना देऊन गेला. यात मुंबई महानगर पालिकेत निवडून आलेल्या ५५ ते ६० परप्रांतीय उमेदवारांच्या नावांची यादी होती. आणि ती यादी वाचल्यावर भविष्यात उभ्या ठाकलेल्या धोक्याची जाणीव झाली. एकूण २२७ नगरसेवकांपैकी ५५ ते ६० नगरसेवक परप्रांतीय? म्हणजे २५% हून जास्त परप्रांतीय नगरसेवक? मनात एकच प्रश्न आला की आम्ही जिंकतोय कि हरतोय? 
आजच्या पिढीला कदाचित महाराष्ट्र राज्य निर्मितीची पार्श्वभूमी माहिती नसेल किंवा हुतात्मा स्मारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे शब्द कानावर पडले असले तरी त्याविषयीची माहिती आधीच्या पिढीकडून त्यांना कदाचित दिली गेली नसेल. आपल्या प्रांताविषयी भाषिक, सांस्कृतिक अस्मिता नवीन पिढीमधे जागवणे ही खरं तर आधीच्या पिढीची जबाबदारी म्हणा किंवा कर्तव्य म्हणा किंवा वारसा सोपवणे म्हणा पण तशी ती असते आणि नेमकी तीच उणीव आपल्या कडून राहून गेली कि काय असं वाटू लागलंय. आपणच जर प्रांतिक अस्मितेच्या बाबत जागरुक राहीलेलो नाही तर नवीन पिढीला दोष देण्यात काय अर्थ आहे? आज साठ परप्रांतीय उमेदवार निवडून आले, उद्या संपूर्ण महानगर पालिका आणि नंतर पूर्ण राज्य परप्रांतीयांच्या ताब्यात गेले आणि एखादा गुजराथी किंवा उत्तर भारतीय महापौर आणि मुख्यमंत्री येऊन शहरावर आणि राज्यावर राज्य करु लागला तर आश्चर्य वाटायला नको. प्रबोधनकारांची तिसरी पिढी जर अशीच एकमेकांच्या उरावर बसण्यात धन्यता मानत राहिली तर तो दिवसही दूर नाही जेव्हा आपल्याच राज्यात आपल्याला उपरे बनून रहावं लागेल.
 
 
भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा हा पहिल्यांदा १९२० साली काँग्रेसच्या नागपुर येथील अधिवेशनात चर्चिला गेला. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांची याला मान्यता होती. पुढे १९४० मधे गं. त्र्य. माडखोलकरांच्या पुढाकाराने महाराष्ट्र एकीकरणाचा मुद्दा चर्चिला गेला. काँग्रेस पुढारी यात लक्ष घालत नसल्याचे पाहुन १९४६ सालच्या माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. स्वातंत्र्योत्तर काळात नेहरुंना इच्छा नसतानाही भाषावार प्रांत रचनेला मान्यता द्यावी लागली. नेहरुंना असं वाटत होतं कि ही संकुचित मानसिकता आहे आणि अशाने राष्ट्रीय एकात्मतेस तडा जाईल म्हणून त्यांचा या गोष्टीला विरोध होता. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन होण्यामागची वेदना किंवा भावना होती ती व्यापार आणि उद्योग भूमीपुत्रांच्या ताब्यात नसण्याची. त्यावेळच्या द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते मोरारजीभाई देसाई जे गुजराथी मारवाडी भांडवलदारांचे समर्थक व पाठीराखे होते. या भांडवलदार वर्गाचा मुंबईसह महाराष्ट्राच्या मागणीला प्रखर विरोध होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचना झाली परंतु महाराष्ट्राचे घोंगडे मात्र या भांडवलदारांच्या विरोधापायी भिजत पडले होते. २२ नोव्हेंबर १९५५ साली मोरारजी देसाई आणि स. का. पाटील यांनी एका जाहीर सभेत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला उद्देशून व त्यांच्या मुंबईसह महाराष्ट्राच्या मागणीला उत्तर म्हणून काही प्रक्षोभक विधानं केली.
स. का. पाटील तर म्हणाले कि पुढील पाच हजार वर्षांत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. या विधानांनी लोकभावनांचा उद्रेक झाला आणि लोकांनी ती सभा उधळली. त्यावेळी झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात १५ माणसे ठार झाली. त्यापुढे जाने. - फेब्रु. १९५६ साली केंद्रशासित मंबईची घोषणा झाली आणि संपूर्ण मुंबईत आगडोंब उसळला. मोर्चे, हरताळ, आंदोलने , सत्याग्रह हे चालू असताना पुन्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ८० आंदोलनकर्ते ठार झाले.राज्यकर्त्यांनी विशेषतः मोरारजीभाईंनी दमन तंत्र अवलंबिले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०५ लोकं हुतात्मा झाले. या आंदोलनात कम्युनिस्ट, सोशालीस्ट, प्रजासमाजवादी पक्षातील डाव्या विचारसरणीचे पुढारी व काँग्रेसेतरांनी मुख्यत्वे भाग घेतला. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस्. एम्. जोशी, प्र. के. अत्रे, श्रीपाद डांगे, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर ही काही महत्वाची नांवे. फाजल अली आयोग, दार कमिशनचा रिपोर्ट, अकोला करार ईत्यादी सोपस्कार पार पडल्यानंतर बेळगांव, निपाणी, कारवार, डांग अशी काही गांवे वगळून मुंबई सह महाराष्ट्राच्या निर्मितीची घोषणा झाली आणि यशवंतराव चव्हाण मंगल कलश घेऊन मुंबईत आले. अशा या राज्यनिर्मिती साठी महाराष्ट्राच्या सीमेवरील उंबरगांव, डांग सारखी कांही गांवे  आणि जिल्हे गुजरात राज्याला द्यावे लागले. शिवाय मुंबईची उभारणी आणि विकास गुजराथी भाषिक आणि भांडवलदारांनी केला म्हणून त्याच्या व्याजा पोटी थोडे थोडके नव्हे तर तब्बल ५० कोटी रुपये दिले. ईतकं सारं होऊनही या परप्रांतीयांचा मुंबईचा मोह काही सुटत नाही आणि ईथेच मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे या घोषणेत तथ्य आहे असं वाटू लागतं. आणि दुर्देवाने मराठी भाषिकांचा कैवार घेणाऱ्या शिवसेनेला व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रेसर अणाऱ्या प्रबोधनकारांच्या तिसऱ्या पिढीला आज त्याची ना खंत आहे ना चाड. 
१९ जून १९६६ साली काँग्रेसच्या गरजेपोटी आणि गिरणगांवातील कम्यनिस्टांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रादेशिक संघटनेची आवश्यकता होती. त्याकाळी वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्यांनी ही जबाबदारी शरद पवार यांच्यावर सोपवली आणि त्यांनी बाळासाहेबांची भेट घेऊन त्यांना तसे सुचवले व बाळासाहेबांना ते मान्यही झाले. पुढे प्रबोधनकारांच्या उपस्थितीत बाळासाहेबांनी प्रबोधनकारांनी सुचवलेल्या नावाने शिवसेना नावाची संघटना सुरु केली. संघटनेचा हेतु हा स्थानिकांचे प्रश्न व समस्यांना वाचा फोडणे आणि ते धसास लावून त्यांना न्याय मिळवून देणे हा होता. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या मार्गाने वाटचाल करण्याचं हे प्राथमिक उद्दिष्ट होतं. या संघटनेचे समर्थक हे बहुतांशी श्रमजीवी वर्गातले व कांही अंशी बुद्धीजीवी पांढरपेशा मध्यम वर्गातले लोक होते. सुरुवातीला हटाव लुंगी बजाव पुंगीचा नारा देत दाक्षिणात्य लोकांविरोधात आंदोलन करुन स्थानिकांना सरकारी नोकरीत प्राधान्य मिळण्यासाठी रस्त्यावर उतरुन राडा करणाऱ्या या संघटनेने मराठी मनाला आकर्षित करुन घेतले. त्यात लोकाधिकार समिती स्थापन करुन नोकरी विषयक समस्या सडवणे व स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळवून देण्यासारखी स्थानिकांच्या जिव्हाळ्याची कामं केली. शाखा शाखां मधून रुग्णवाहीका उपलब्ध करुन  दिल्या, लोकांच्यातील तंटे मिटवले, व्यवहारांतील वाद विवादात मध्यस्थी करुन ते मार्गी लावुन दिले अशा प्रकारची कामं करत सामान्यांचा मसीहा बनण्याची कामं केली. नगरपालिकेची स्थानिक पातळीवरची कामं करता करता हळू हळू समाजकारणाचा टक्का कमी होत गेला आणि राजकारणाचा टक्का वाढू लागला. शिवसेना राजकारणात आली. अत्रेंनी शिवसेनेची संभावना ही कसली शिवसेना हि तर वसंतसेना असे म्हणून केली. त्याकाळातले शिवसेनेतले दिग्गज नेते हे खरोखर सत्शील आणि आक्रमक शैलीचे होते. दत्ताजी नलावडे, दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, सुधीर जोशी अशी एक एक दिग्गज, सचोटीची आणि तळमळीची अनेक नेते मंडळी होती त्यांच्या तालमीत पुढची पिढी तयार होत होती. सेना जोमाने वाढत होती बाळसं धरत होती. बाळासाहेबांच्या किर्तीचा डंका सर्वत्र वाजत होता. आता समाजकारणाचा टक्का कमी कमी होत चालला आणि राजकारणावर पकड मजबुत होत गेली. शिवसेनेने आपला महापौर बनवला, तो समुद्र किनारी असणाऱ्या आलीशान अशा महापौर निवासात रहायला गेला, महापौरांसाठी त्या काळी असलेल्या लांब लचक चकचकीत आणि वर दिवा असलेल्या इंपाला कार मधून फिरु लागला. लोकांची कामं व्हायला लागली. शाखा प्रमुख, नगरसेवक हे तळमळीने आणि आपुलकीने लोकांची कामं करु लागले आणि शिवसेनेचा चाहता वर्ग आणि मतदार वाढू लागला. परप्रांतीयांच्या उरात शिवसेना म्हंटल्यावर धडकी भरायला लागली. भांडवलदार, पुंजीपती वचकून राहू लागले. शिवसेना आणि बाळासाहेब आता मराठी लोकांच्या गळ्यातला ताईत झाले. नवनवीन कार्यकर्ते पुढे येऊ लागले विचारसरणीत बदल व्हायला लागला आता संघटने बरोबर स्वतःची वाढ कशी होईल हे समजणारी मंडळी पदाधिकारी होऊ लागली. बस आणि ट्रेन ने नोकरीच्या ठिकाणी जाऊन नोकरी सांभाळून संघटनेचं काम करणारी माणसं कमी होऊ लागली व्यवहार समजणारी पूर्णवेळ काम करणारी माणसं पुढे येऊ लागली आणि मराठी मागे पडून हिंदुत्वाची कास धरली गेली. आता परप्रांतीय गुजराथी भाषिक किंवा हिंदी भाषिक उत्तर भारतीय भांडवलदार मंडळी व्यवहारी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हाताशी धरुन आपला आणि बरोबरीने त्यांचाही कार्यभाग साधायला लागले. नाक्यावर ऊभा रहाणारा सैनिक आता आलिशान एस्. यू. व्ही मधून फिरु लागला. सेना कार्यकर्ता आता भांडवलदारांच्या मांडीला मांडी लावून बसू लागला.महानगर पालिकेच्या आणि राज्य सरकारातील सत्ता सहभागातून तो आपली प्रगती करु लागला. परप्रांतीय भांडवलदारांना आता वचक राहीला नाही. तडजोडी आणि सौदेबाजीतून व्यापक हिंदुत्व जपले जात होते. सेनेची प्रगती लोकसभेत सभापती, केंद्रात मंत्री आणी राज्यात मुख्यमंत्री व महानगरपालिकेत महापौर अशी एकाच वेळी तीनही ठिकाणी अधिकार गाजवण्या ईतपत झाली. बाळासाहेब थकत चालले होते. या सर्व प्रवासात मराठी मतदार त्यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या सोबत होता. मुंबई परप्रांतीय भांडवलदारांच्या हातात जात असताना मराठी मतदार उघड्या डोळ्यांनी पहात होता. नगरसेवक आणि शाखा प्रमुखांना गाड्यांमधून फिरताना असहाय्य पणे पहात होता. शाखेच्या दारात जायला तो कचरत होता कारण तिथल्या लोकांची देहबोली आणि बोली भाषा बदलली होती. पहिली पिढी लुप्त होऊन दुसरी पिढी आली होती तरीही मतदार प्रेमापोटी शिवसेनेला धरुन राहीला. हळू हळू जुन्या चाळी पाडून त्याजागी नवीन ईमारती होऊ लागल्या नवीन जागेत जुन्या मतदाराला रहाणे परवडेनासे झाले. मध्यंतरीच्या काळात गिरणी संप झाला . गिरणी कामगार देशोधडीला लागला.सेनेचा हक्काचा मतदार मुंबईतून परागंदा झाला खरं तर ही चाहुल सेनेने ओळखायला हवी होती. पण तसं झालं नाही. भांडवलदारांसोबतच्या सलगी मुळे मतदारा वरचं लक्ष उडालं होतं. ईतर पक्षांकडूनही हे होत होतं पण सेनेकडून ही अपेक्षा नव्हती. सेनेला हे परवडणारं नव्हतं. सेनेची मूळ मुंबईकराशी नाळ जोडली गेलेली होती . स्थानिकांनी, स्थानिकांच्या हितासाठी ऊभारलेली स्थानिकांची संघटना असं तिचं स्वरुप होतं. ते जसं बाळासाहेबांचं अपत्य होतं तसंच ते स्थानिकांच्या अंगा खांद्यावर खेळून बागडून मोठं झालेलं होतं. त्याने स्थानिकांना वाऱ्यावर सोडणं स्थानिकांना अपेक्षित नव्हतं. स्थानिक मनातून दुखावला होता. ऊपनगराच्याही पलीकडे गेला होता तरीही आफल्या अपत्यावर लक्ष ठेऊन होता. त्याच्यावर प्रेम करत होता. साहेबांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात साहेबांना कौटुंबिक कलहाला सामोरे जावे लागले. साहेबांनी आपल्या सावलीला बाजूला सारले आणि रक्ताला प्राधान्य दिले. ईथे मराठी मनाला जबर धक्का बसला. तो सैरभैर झाला. सुरुवातीच्या काळात त्याने दोघांनाही साथ दिली. साहबांची अगतिकता मतदारांना समजत होती. बंगल्यावरच्या कटकारस्थानात बाळासाहेब कसे हतबल झालेत हे सांगोवांगी कळत होते. ज्या शिवाजी महाराजांच्या नांवाने संघटना काढली त्यांच्या अखेरच्या काळात कौटूंबिक कलहामुळे त्यांची जी अवस्था झाली होती तीच गत बाळासाहेबांची झाली होती. अखेर या थकलेल्या वाघाने आपला देह ठेवला. अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. सथानआंचा कैवारी स्थानिकांना मागे टाकून अनंतात विलीन झाला. मतदार पोरका झाला. अंतिम क्षणी साहेबांनी आप मुलगा आणि नातू यांना मतदारांच्या हाती सुपूर्द केलं आणि आवाहन केलं कि यांचा सांभाळ तुम्हीच करा. मलाशी साथ दिलुत तशी या दोघांना साथ द्या. मतदार विद्ध झाला होता.  त्यानेही निश्चय केला कि साहेबांचा आदेश पाळायचा. परंतु या कांही वर्षांत सैनिक कमी झाले होते सरदआर वढले होते. भांडवलदारांचं प्रस्थ वाढलं होतं. ज्या पक्षाशी युती केली होती तो ही आता शिकून सवरुन मोठा झाला होता. तो आता समन वाटची भाषा करु लागला. सेनेच्याच आशीर्वादाने पोसली गेलेली भांडवलदार परप्रांतीय मंडळी रात्री स्वयंपाक घरात आवरा आवर झाल्यावर डोकं वर काढण्यासाठी टपून बसलेल्या झुरळांसारखी डोकं वर काढण्यासाठी निवडणुकीची वाट पहात होतीच. आता केंद्रात गुजराथी भाषिक पंतप्रधान आणि राज्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महाविदर्भाची मागणी करणाऱ्या वैदर्भीय नेत्यांचा आजच्यापिढीतला चाणाक्ष प्रतिनीधी मुख्यमंत्री म्हणून बसलेला आहे. भांडवलदार वर्गाला, परप्रांतीयांना मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी आवश्यक असणारं पोषक असं वातावरण तयार आहे. स्थानिकांची, स्थानिकांच्या हितासाठी, स्थानिकांनी काढलेली, वाढवलेली, जोपासलेली संघटना गाफील राहीली अंतर्गत कलह शिखरावर आहे आता रात्र वैऱ्याची आहे. राजा बेसावध, गाफील आहे. मतदार गोंधळलेला आहे. अशा परिस्थितीत मतदान झालं. सेनेच्याच बिल्डर धार्जिण्या आणि भांडवलदार धार्जिण्या  धोरणांमुळे मुंबई बाहेर ढकलला गेलेला मराठी टक्का घसरला. बुद्धीजीवी उच्च मध्यमवर्गीय पांढरपेशा मतदार, परप्रांतीय गुजराथी भाषिक आणि ईतर भाषिक.परप्रांतीयांनी आपल्यातली आजवर दाबून ठेवलेली प्रांतिक आणि भाषिक अस्मिता बाहेर काढली आणि परप्रांतीय उमेदवारांना घसघशीत मतदान केले. ज्या ठिकाणी सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला तेथिल तफावतीत फरक पडला मतांचा फरक कमी झाला. जर हे असंच सुरु राहीलं तर ऊद्या सर्व काही परप्रांतीयांच्या हाती जाईल. आम्हाला परप्रांतीयांचा विटाळ नाही पण त्यांनी पाहुण्या सारखेच वागावे अशी आमची ईच्छा आहे. स्थानिक आणि राज्य प्रशासन हे भूमीपुत्रांच्याच हातात असावे. ईथे राज्य आमचंच असेल तुम्ही उद्योगधंदे, व्यापार उदीम करायला आला आहात तेवढेच करा. सत्तेची स्वप्न पहाणं सोडून द्या. ऊद्धव आणि राज यांनीही ऊद्या येणारं संकट ओळखून स्थानिकांच्या हीतासाठी आणि स्वतःच्या हीतासाठी हातमिळवणी करुन एकत्र यावं अन्यथा विनाश अटळ आहे. 
म्हणूनच म्हणतो महानगर पालिकेत ८४ जागांवर आणि ७ जागांवर येणं याला काय म्हणायचं? आम्ही जिंकतोय? कि हरतोय?