शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
2
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
3
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
4
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
5
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
6
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
7
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
8
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
9
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
11
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
12
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
13
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
14
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
15
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
16
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
17
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
18
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
19
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...

मुंबईत आज मॅरेथॉन आणि सनबर्नही

By admin | Published: January 15, 2017 4:54 AM

रविवारी होत असलेल्या मुंबई मॅरेथॉन व सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाचा मार्ग त्याच्या पूर्वसंध्येला मोकळा झाला. मॅरेथॉन स्पर्धेसाठी विनापरवाना जाहिरातबाजी केल्याप्रकरणी

मुंबई : रविवारी होत असलेल्या मुंबई मॅरेथॉन व सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाचा मार्ग त्याच्या पूर्वसंध्येला मोकळा झाला. मॅरेथॉन स्पर्धेसाठी विनापरवाना जाहिरातबाजी केल्याप्रकरणी ५ कोटींचे शुल्क भरण्याचे फर्मान काढणाऱ्या महापालिकेने शनिवारी जेमतेम २३ लाख रुपये जमा करून घेत स्पर्धेला हिरवा कंदील दिला. दुसरीकडे सनबर्नला परवानगी नाकारणाऱ्या मुंबई पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आयोजकांनी आवश्यक बाबींची पूर्तता केल्याचे सांगून कार्यक्रमास मंजुरी दिली. मॅरेथॉन व सनबर्नबाबत पालिका प्रशासन व मुंबई पोलिसांनी लोटांगण घालण्यामागे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले. त्यामुळेच आयत्यावेळी त्यांना नमती भूमिका घ्यावी लागल्याची चर्चा होती. ‘स्टॅण्डर्ड चार्टर्ड’मार्फत २००४पासून मुंबईत दरवर्षी मॅरेथॉन आयोजन करण्यात येते. मात्र या स्पर्धेसाठी मुंबईत लावण्यात येणाऱ्या फलकांचे-जाहिरातींचे शुल्क चुकवण्यात येत नसल्याने यापूर्वीही अनेकवेळा महापालिका आणि आयोजकांमध्ये वाद झाला आहे. या वेळेस ‘लेजर शो’चेही आयोजन केले आहे. मात्र जाहिरात शुल्क, भू-वापर शुल्क आणि सुरक्षा ठेव जमा करण्यात न आल्याची गंभीर दखल घेत ५ कोटी ४८ लाख ३० हजार ६४३ एवढी रक्कम २४ तासांत भरण्याची नोटीस महापालिकेने पाठवली होती. दुसरीकडे बंगळुरूपाठोपाठ मुंबई पोलिसांनीही परवानगी नाकारल्यामुळे सनबर्न फेस्टिव्हलच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र रातोरात कागदपत्रांची पूर्तता केल्याने शनिवारी त्यांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे बीकेसीत सनबर्न फेस्टिव्हलमध्ये फ्रेंच डीजे डेव्हिड गेटाचा कॉन्सर्ट होणार आहे. पुण्यातील फेस्टिव्हलमध्येही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सनबर्नला १ कोटी ४० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कायदेशिर प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे सनबर्नच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारल्याचे पोलीस आयुक्त प्रवक्ते अशोक दुधे यांनी जाहीर केले होते. मात्र एका रात्रीत आयोजकांनी आवश्यक असलेली सर्व माहिती, सुरक्षिततेच्याबाबत सर्व उपाययोजना राबविण्याची हमी, आवश्यक कागपत्रांची पूर्तता केली. त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात आल्याचे शनिवारी दुधे यांनी सांगितले.- दोन्ही कार्यक्रमांसाठी आयोजकांनी लाखोंचा खर्च केला आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध यंत्रणा काम करीत आहेत. पालिका व पोलिसांनी परवानगी नाकारल्याने शनिवारी आयोजकांनी उच्च स्तरावरून प्रयत्न केले. दिल्लीतूनही त्याबाबत फोनाफोनी झाली. त्यामुळे पालिका व पोलिसांना परवानगी देण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्याची चर्चा आहे.जाहिरातबाजीच्या शुल्काच्या गैरसमजुतीतून महापालिकेने ही नोटीस पाठवली आहे. त्यावर आता चर्चा करण्यासाठी अवधी कमी असल्याने गेल्या वर्षीप्रमाणेच शुल्क स्वीकारण्याची विनंती आयोजकांनी केली.