शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

31 जानेवारीला मुंबईत मराठ्यांचं वादळ धडकणार

By admin | Published: January 05, 2017 8:35 PM

मुंबईत 31 जानेवारीला मराठा समाजाचा मोर्चा मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदानापर्यंत निघणार आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 5 - कोपर्डीतील बलात्कार करणा-यांना फाशीची शिक्षा आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विविध जिल्ह्यांत मराठा क्रांती मोर्चा यशस्वी झाला असतानाच आता मुंबईत मराठ्यांचं वादळ धडकणार आहे. मुंबईत 31 जानेवारीला मराठा समाजाचा मोर्चा मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदानापर्यंत निघणार आहे. 31 जानेवारीला दुपारी 1 वाजता मरिन ड्राइव्हहून मोर्चाला सुरुवात होणार असून, तो थेट आझाद मैदानात जाऊन थांबणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह थेट राज्यपालांनाही निवेदन देण्यात आलं आहे. मराठा समाजाला अद्यापही आरक्षण न दिल्याबद्दल सरकारच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा मोर्चाच्या आयोजकांनी दिली आहे. (VIDEO- मराठा मोर्चासाठी मुंबईत बाइक रॅलीचं आयोजन)कोपर्डी बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर राज्यभरात हे मोर्चे सातत्यानं काढण्यात आले आहेत. या मोर्चात लाखोंच्या संख्येनं मराठा समाजातील लोकांनीही सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे हे सर्व मोर्चे शिस्तबद्ध पद्धतीनं शांततेत काढण्यात आले आहेत. मोर्चासाठी विदर्भासह मराठवाड्यातून हजारो मोर्चेकरी सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा तरुणींच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आरक्षण देण्यासंदर्भात निवेदनही दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता.