ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. २० : मराठवाड्यात मागील ५० दिवसांहून अधिक काळ पावसाचा पडलेला खंड विभागाला दुष्काळाकडे घेऊन गेलेला असतानाच १९ जुलैच्या दुपारनंतर विभागात कुठे संततधार तर कुठे अतिवृष्टीमय पावसाने हजेरी लावली. विभागातील ४२१ पैकी १७० मंडळात ६५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत विभाग संततधारेने वेढला होता.
श्रावण अखेरीस लागलेल्या या संततधारेमुळे पोळ्याच्या तोंडावर शेतक-यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी त्यामुळे पिकांना जीवदान मिळेल, खरीप हंगामाला फायदा होईल, असे दिसत नाही.
विभागात एकूण ४२१ मंडळ आहेत. त्या अखत्यारीत पावसाची नोंद घेतली जाते. त्या मंडळातील १७0 क्षेत्रात अतिवृष्टीच्या म्हणजेच ६५ मि.मी.च्या पुढे पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या परिमाणकामध्ये ६५ मि.मी.च्या पुढे अतिवृष्टी गणली जाते. औरंगाबादमध्ये ५, जालन्यातील ३, परभणीतील ४, हिंगोलीतील ४, नांदेडमधील ५६, बीडमधील ३५, लातूरमधील ४७, उस्मानाबादमधील १६ मंडळात अतिवृष्टी झाल्याचे विभागीय
आयुक्त महसूल विभागाने कळविले आहे. जिल्हा मंडळ अतिवृष्टीऔरंगाबाद ६५ ०५जालना ४९ ०३परभणी ३९ ०४हिंगोली ३० ०४नांदेड ८० ५६बीड ६३ ३५लातूर ५३ ४७उस्मानाबाद ४२ १६एकूण ४२१ १७0
या मंडळात अतिवृष्टी
औरंगाबाद जिल्ह्यातील ढोरकिण, सिल्लोड, अजिंठा,अमठाना,भेंडाला, जालन्यातील अन्वा, गोंदी, तीर्थपूरी, परभणीतील पुर्णा, ताडकळस,चुडावा, लोमला मंडळात तर हिंगोलीतील माळहिवरा, सिरसम, वासंबा, हयातनगर मंडळात अतिवृष्टी झाली.
नांदेड जिल्ह्यातील नांदेड, तुप्पा, विष्णुपुरी, वसरणी, वजिराबाद, नांदेड ग्रामीण, तरोडा, लिंबगाव, मुदखेड,मुगट, बारड, अर्धापूर, दाभड, भोकर, किनी, मोघाळी, मातूळ, उमरी, सिंधी, गोळेगांव, कुरूळा, उस्माननगर,पेठवडज, वारूळ, लोहा, कलंबर, सोनखेड, शिवडी, कापशी, शिवणी, तामसा, मनाठा, पिंपरखेड, देगलूर, खानापूर, शहापूर, बिलोली, आदमपूर, लोहगांव, सगरोळी, कुंडलवाडी, धर्माबाद, जारीकोट, करखेली, लायगाव, तरसी, मांजरम, बरबडा, कुंटूर, मुखेड, जांब, येवती, जाहूर, चांडोळा, मुक्रमाबाद, बा-हाळीमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.
बीड जिल्ह्यातील बीड, राजूरी, पेडगाव, मांजरसुंबा, चौसाळा, नेकनूर, पिंपळनेर, पाली, लिंबागणेश, पाटोदा, थेरला, अंमळनेर, दासखेड, आष्टी, कडा, धामणगांव, टाकळसिंग, गेवराई, धोंडराई, उमापूर, जातेगाव, शिरूर कासार, रायमोह, तिंतरवणी, अंबाजोगई, घाटनांदूर, लो.सावरगाव, बर्दापूर, विडा, ह.पिंपरी, बनसारोळा, नांदूरघाट, धारूर, परळी, शिरसाळा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यातील लातूर, गातेगांव, तांदूळजा, मुरूड, बाभळगांव, चिंचोली, औसा, लामजाना, किल्लारी, मातोळा, भादा, किनीथोट, बेलकुंड, रेणापूर, पोहरेगाव, कारेपूर, पानगांव, उदगीर, मोघा, हेर, देवर्जन, वाढवणा, नागलगाव, अहमदूपर, किनगांव, खंडाळी, शिरुर ताजबंद,हाडोळती अंधोरी, चाकूर,वडवळ, नळेगांव, झरी, शेळगांव, जळकोट, घोन्सी, निलंगा, अंबुलगा, मदनसुरी,औराद, निटूर,पानचिंचोली, देवणी, बलांडी, शिरुर अनंतपाळ, हिसामाबाद, साकोळ मंडळात तर उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण, तेर, ढोळी, वैबळी, पाडोळी, जागजी, केसेगाव, सालगरा, नारंगवाडी, कळंब, भूम, ईट, मानेकश्वर, वाशी, जेवळा या मंडळात जोरदार पावसाची नोंद झाली.