ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांचा दोन वर्षानंतर हा दुष्काळ दौरा असून ते मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना भेट देणार आहेत.
यावेळी राज ठाकरे यांनी बोलताना मराठवाड्यात पडलेला दुष्काळ हा मानवनिर्मित असल्याचा आरोप केला. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी केलेली धोरणे चुकल्याने हा परिणाम भोगावा लागत आहे. याचबरोबर राज्य सरकारने बांधलेल्या 33 हजार विहिरी आहेत तरी कोठे याची पाहणी करणार असल्याचे सांगितले. आता ट्रेनने पाणी आणलं जातयं, असे किती दिवस आणणार, असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी केला.