शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

मराठवाडा, विदर्भाला ‘नमो किसान’चा फायदा; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला सर्वांत कमी लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 5:42 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याची जी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत गुरुवारी राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याची जी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली, त्यात सर्वाधिक लाभ हा मराठवाडा आणि विदर्भाला मिळाला. कोकणातील जिल्ह्यांना सर्वांत कमी लाभ मिळाला. मराठवाड्यात सर्वाधिक निधी बीडला मिळाला. 

जिल्हावार वाटपाची आकडेवारी बघता अहमदनगर (१०३.५२ कोटी) अव्वलस्थानी आहे. सर्वांत तळाला ठाणे (१३.६७ कोटी)  जिल्हा आहे. अहमदनगरमधील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे ५ लाख १७ हजार ६११, तर सर्वांत कमी ठाणे जिल्ह्यातील ६८ हजार ३६७ आहे. चार लाखांवर लाभार्थी असलेल्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर (४,५४,०४०) आणि कोल्हापूरचा (४,०६,२४०) समावेश आहे.

जिल्हावार निधी (आकडे कोटी रुपयांमध्ये)

अहमदनगर १०३.५२, अकोला ३७.५६, अमरावती ५३.१८, छत्रपती संभाजीनगर ६५.३७, बीड ७७.९१, भंडारा ३७.२१, बुलडाणा ६६.३८, चंद्रपूर ४३.३२, धुळे २८.४९, गडचिरोली २५.९३, गोंदिया ४२.४८, हिंगोली ३६.१२, जळगाव ७५.९१, जालना ५७.९५, कोल्हापूर ८१.२५, लातूर ५३.४६, नागपूर ३०.०८, नांदेड ७५.४८, नंदुरबार १९.३२, नाशिक ७७.०७, धाराशिव ४२.२८, पालघर १६.०७, परभणी ५३.४२, पुणे ७७.९७, रायगड १९.६५, रत्नागिरी २५.५२, सांगली ७७.४४, सातारा ७८.६७, सिंधुदुर्ग २१.६२, सोलापूर ९०.८१, ठाणे १३.६७, वर्धा २४.६८, वाशिम ३०.८१, यवतमाळ ५५.४३.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना