मुंबई/औरंगाबाद : दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, उस्मानाबादमध्ये शुक्रवारी अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला असून, मांजरा व तेरणा नद्यांना पूर आल्याने १५ गावांचा संपर्क तुटला आहे. कोकण, मुंबई आणि मराठवाड्यात आणखी आठ दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.>पाणीप्रश्न निकालीमांजरा प्रकल्प क्षेत्रात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ३५ दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला आहे. हे पाणी पुढचे दहा महिने लातूर शहराला पुरेल. >धरणे भरली : यंदा राज्यातील धरणांमध्ये तब्बल दुप्पट पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील जलाशयांत ४४ टक्के पाण्याची आवक झाली आहे. राज्यात सध्या सरासरी ७१ टक्के असलेला पाणीसाठा गेल्या वर्षी २३ सप्टेंबरला केवळ ३२ टक्के होता.>नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. उस्मानाबादमध्ये भिंत पडून ४ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. बीडमध्ये पुरात तिघे वाहून गेले. राज्यात पावसाचे एकूण पाच बळी गेले.
मराठवाडा, कोकणात पाणीच पाणी
By admin | Published: September 24, 2016 6:21 AM