शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

वेगळ्या विदर्भासाठी निघणार मार्च

By admin | Published: July 07, 2014 1:06 AM

स्वतंत्र विदर्भासाठी नागपूर ते दिल्ली पायी मार्चचा नारा विदर्भ जॉर्इंट अ‍ॅक्शन समितीने रविवारी दिला. रविभवनात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी व्हेरायटी चौक

नागपूर-दिल्ली पायी जाणार : विदर्भ जॉर्इंट अ‍ॅक्शन समितीचा निर्णयनागपूर : स्वतंत्र विदर्भासाठी नागपूर ते दिल्ली पायी मार्चचा नारा विदर्भ जॉर्इंट अ‍ॅक्शन समितीने रविवारी दिला. रविभवनात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी व्हेरायटी चौक येथून हा मार्च निघणार आहे. सात राज्यातून तो मार्गक्रमण करीत २८ दिवसांनी दिल्लीत पोहचेल. येथे स्वतंत्र विदर्भासह २४ मागण्यांचे निवेदन पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना भेटून देण्यात येईल.शहरातील २२ संघटनांचा या समितीमध्ये समावेश आहे. माजी कुलगुरू हरीभाऊ केदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या सर्वच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नागपूर-दिल्ली पायी मार्चची रूपरेषा ठरविण्यात आली. या संदर्भात माहिती देताना वरिष्ठ पत्रकार व समितीचे संयोजक प्रभाकर कोंडबत्तुनवार म्हणाले, शिक्षक दिनी हा पायी मार्च निघेल. महाराष्ट्रसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या सहा राज्यातून हा मार्च जाईल. साधारण २८ दिवसांचा हा मार्च २५ ठिकाणी मुक्काम करेल. विदर्भ महाराष्ट्रात विलीन होऊन ५४ वर्षे झाली म्हणून या मार्चमध्ये कमीतकमी एवढे पदयात्री राहतीलच. दिल्लीत हा मार्च पोहचल्यावर राष्ट्रपती व पंतप्रधान यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात येईल. या भेटीत स्वतंत्र विदर्भासह २४ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येईल. यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत, भारनियमन, भाववाढ, नक्षलवाद, जिल्ह्याचे विभाजन या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येईल. बैठकीला छैलबिहारी अग्रवाल, रमेश ढोमणे, बलदेव सोनेवाने, एम.पी.तिवारी, लता मानकर, राजधर भेलावे, राहुल थोरात, क्लॉडियस पीटर, रोशन हिरणवार, भगवानदास राठी, माजी आमदार भोला बढेल, संगीता खोब्रागडे, आशा पाटील, शेख मुहमुद्दीन, कैलास चरडे, आनंद चौरे, विलास भालेकर यांच्यासह मोठ्या संख्येत विदर्भवादी उपस्थित होते. (प्रतिनिधी)