मुंबई : धुळ््यातील जिल्हा रुग्णालयात निवासी डॉक्टराला झालेल्या मारहाण प्रकरणी राज्यभरातील ४ हजारहून अधिक निवासी डॉक्टर शुक्रवारी मासबंक करणार होते. मात्र हा राज्यव्यापी ‘मासबंक’ गुरुवारी रात्री उशिरा मागे घेण्यात असून उद्या १७ मार्च रोजी केवळ इंडियन मेडिकल असोसिएशन या प्रकरणी आझाद मैदान येथे निदर्शने करणार आहेत.गेल्या २ वर्षात डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या ४५ घटनांची नोंद झाली आहे. मात्र या प्रकरणांमध्ये पोलीसांमध्ये तक्रार दाखल करुनही निकाल न लागल्याने डॉक्टरांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे प्रलंबित मागण्या, तक्रारींसाठी राज्यव्यापी मासंबक करण्यात येणार होता. परंतु, यापूर्वी न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयाचा निर्वाळा देत मार्ड संघटनेने हा मासबंक मागे घेतला आहे. निवासी डॉक्टरांची सुरक्षा, डॉक्टरांना क्षयरोग आणि प्रसूती रजेची मान्यता, वसतीगृहांचा दर्जा सुधारणे, फ्रीशीपचा प्रश्न तक्रार निवारण कक्ष स्थापणे, डॉक्टरांसाठी विमा योजना अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी मार्ड संघटना आग्रही आहे. याविषयी, मार्डचे सचिव डॉ. स्वप्निल मेश्राम यांनी सांगितले की न्यायालयाच्या निर्णयामुळे मासबंक मागे घेतला आहे. मासबंकचा रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये,याकरिता ही भूमिका घेण्यात आली आहे. काळ्या फिती लावून निवासी डॉक्टर निदर्शने करणार असून मार्डची पुढील भूमिका चर्चा करुन ठरविण्यात येईल. (प्रतिनिधी)
मासबंकमधून मार्डची माघार
By admin | Published: March 17, 2017 3:32 AM