शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मारियांना ‘सायोनारा’!

By admin | Published: September 09, 2015 5:18 AM

मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा कार्यकाळ महिनाअखेरीस संपणार असतानाच अचानक त्यांची उचलबांगडी करून महासंचालकपदी (होमगार्ड) बढती देण्यात आली.

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा कार्यकाळ महिनाअखेरीस संपणार असतानाच अचानक त्यांची उचलबांगडी करून महासंचालकपदी (होमगार्ड) बढती देण्यात आली. तर त्यांच्या जागी होमगार्ड विभागाचे महासमादेशक अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली. जपान दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी हा फेरबदल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारियांना ‘सायोनारा’ (बाय-बाय) केल्याचे म्हटले जाते.दरम्यान, मारिया यांच्या अशा तडकाफडकी बदलीवर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमातून टीकेचा जोरकस सूर उमटल्याने शीना बोरा हत्याकांडाचा तपास मारिया यांच्याकडेच ठेवून सरकारने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. जपानला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री १० वाजता गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्याशी वर्षा निवासस्थानी चर्चा करून मारिया व अहमद जावेद यांच्या फेरबदली आदेशावर सही केली. गृहविभागाने मंगळवारी तातडीने मारिया यांच्या पदोन्नती व बदलीचे आणि जावेद अहमद यांना मुंबईचे पोलीस आयुक्तपदी नेमण्याचे आदेश जारी केले. वास्तविक, मारिया यांची पदोन्नती सप्टेंबरअखेर होणार होती. मात्र, २२ दिवस (पान २ वर)विदेश दौऱ्यापूर्वी बदल्याविदेश दौऱ्यावर रवाना होताना बदल्या करण्याचा जणू प्रघातच मुख्यमंत्र्यांनी पाडला असून, असा अनुभव आज चौथ्यांदा आला. विदेश दौऱ्यावर जाताना ते महत्त्वाच्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करतात.अखेर जावेद यांना मिळाली संधीदीड वर्षापूर्वी मुंबई पोलीस आयुक्तांच्या नेमणुकीवरून बरेच राजकारण झाले. मारिया यांच्यासोबत अहमद जावेद हेदेखील शर्यतीत होते. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रहामुळे मारिया यांची वर्णी लागली. अखेर निवृत्तीपूर्वी पाच महिने का होईना जावेद यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली. १९८०च्या बॅचचे आयपीएस असलेले अहमद जावेद हे पुढच्या वर्षी ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना आयुक्त म्हणून जेमतेम साडे चार महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यानंतर राज्य सरकार आपल्या अधिकारात तीन महिन्यांची मुदतवाढ देऊ शकते.यापूर्वी अहमद जावेद यांनी आठ वर्षांपूर्वी मुंबईत सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांनी अपर महासंचालक (प्रशासन), नवी मुंबईचे पोलीस आयुक्त व अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) काम पाहिले आहे. १८ फेबु्रवारी २०१४ रोजी त्यांची महासंचालकपदी बढती मिळून होमगार्डच्या महासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली होती.मारियांची बदली का? राष्ट्रवादीचा सवालपदोन्नती देणे, बदली करणे हा सरकारचा अधिकार आहे. पण, सरकारकडून योग्य ती स्पष्टता झाली पाहिजे. राकेश मारिया हे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. याकूब मेमनच्या दफनविधीच्या काळात त्यांनी शहरातील परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली होती. सध्याच्या शीना बोरा प्रकरणाचा तपासदेखील योग्य रीतीने सुरू होता. त्यांची नियमानुसार ३० सप्टेंबर रोजी बदली होणार असताना अगोदरच अशा पद्धतीने तडकाफडकी बदली केली जाते. याबाबत राज्य सरकारकडून स्पष्टता झाली पाहिजे, असेही तटकरे म्हणाले. तर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वेगळाच शोध लावला. ते म्हणाले, मारिया यांच्या बदलीमागे दिल्ली आणि गुजरातमधील बड्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे.मारिया रजेवरआकस्मिक बढतीमुळे नाराज झालेल्या मारिया यांनी होमगार्डचा पदभार स्वीकारला. मात्र त्यानंतर ते किरकोळ रजेवर गेलेले आहेत. या निर्णयाबाबत काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.बदलीमागील कारणे?1 ) ललित मोदी प्रकरणात त्यांनी केलेला खुलासा समाधानकारक नव्हता; तरीही त्यांना तेथे ठेवले गेले. कारण सप्टेंबरमध्ये तशीही त्यांची बदली होणार होती.2) भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्तक्षेपामुळे मारिया यांची बदली ३० सप्टेंबरपर्यंत टाळण्याचे ठरले होते; मात्र शीना बोरा प्रकरणी मारिया अन्य कोणत्याही अधिकाऱ्यास तपासच करू देत नव्हते. त्यांचा व्यक्तिगत ‘इंटरेस्ट’ अनेक प्रश्न निर्माण करत होता. 3) शरद पवार यांच्याशी असलेले संबंध हा या सगळ्यात कळीचा मुद्दा ठरला.महिला-मुलांच्या सुरक्षेला प्राधान्यशहरातील कायदा व सुव्यवस्था, महिला व बालकांची सुरक्षा आणि सर्वसामान्य नागरिकाला पोलीस ठाण्यात सन्मानजनक वागणूक मिळणे, या तीन बाबींवर आपले प्राधान्य राहणार आहे.- अहमद जावेद, पोलीस आयुक्त