मरिनर दिलीप भाटकर यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण
- जयंत धुळप, ऑनलाइन लोकमत
अलिबाग, दि. १० - कोकणातील बंदरे आणि त्या माध्यमातून जहाज वाहतूक या माध्यमातून कोकण विकासाची महत्वाकांक्षा निश्चित साध्य करता येवू शकते यात शंका असण्याचे कारण नाही, मात्र त्या करिता मागील किमान पन्नास वर्षाच्या ईतिहासाचा अभ्यास आणि आगामी पन्नास वर्षाचा वेध घेवून परिपूर्ण असे नियोजन करणो अत्यावश्यक आहे,अशी भूमिका जहाजे आणि जहाज वाहतूक क्षेत्रतील गेल्या तब्बल 35 ते 40 वर्षाचा प्रदिर्घ अनूभवी आणि कोकणातील रत्नागीरी येथील मरिन सिंडीकेट प्रा.लि.चे संस्थांपक मरिनर दिलीप भाटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.
कोकणातील पायाभूत सागरी सुविधा आणि व्यावसायीक विकास
मरिनर भाटकर हे मरिन ईंजिनिअरींग मधील विशेष गुणवत्तेसह पदवी संपादन केलेले मरिनर असून प्रथम श्रेणी मरिन चिफ ईंजिनिअरिंगचा त्यांचा प्रदिर्घ अनूभव आहे. त्यांनी शिपबोर्ड सेलिंग, शिप रिपेअर्स, ड्राय डॉकींग,शिप ऑपरेशन,शिप बिल्डींग या क्षेत्रत परदेशांतही काम कामे केले आहे. त्यातूनच कोकणास लाभलेल्या नैसर्गीक समुद्र किनारपट्टीचा सुयोग्य उपयोग करुन घेवून कोकणचा विकास ख:या अर्थाने साध्य करण्याच्या हेतूने त्यांनी रस्ते बांधणी, बंदर बांधणी, मरिन स्ट्रक्चर्स, कार्गो हॉपर्स, कार्गो हॅन्डलिंग ईक्विपमेंट्स, व्हेसल रिपेअर्स या मधील तज्ज्ञ व अनूभवी अभियंते प्रफूल्ल मगर,नामांकीत मेकॅनिकल इंजिनिअर व प्रत्यक्ष समुद्रातील शिपबोर्ड अनूभवी व फ्यूएल इंजेकशन डिङोल इंजिन तज्ज्ञ अभियंते अशोक घाटे, कोकण व गुजराथ मधील शिप ट्रेड हॅन्डलिग मधील अनूभवी मास्टर मरिनर हाशमत मुलाजी, विज निर्मीती व वितरण क्षेत्रतील तज्ज्ञ अभियंते दर्शन भाटकर, कोकणातील विकासा प्रक्रीयेतील अनूभवी व कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.एस.बी कद्रेकर आदि विविध क्षेत्रतील तब्बल 22 तज्ज्ञाची कोकणातील पायाभूत सागरी सुविधा आणि व्यावसायीक विकास या मुद्यावर वैचारिक मोट बांधून मरिन सिंडीकेटच्या माध्यमातून गेल्या 10-15 वर्षापूर्वीच प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला आहे.
जागतिक जहाज व्यवसायात विश्वास
कोकणच्या किनारपट्टीत भर समुद्रात बंद पडलेली व्यापारी जहाजे, वादळात फसलेली जहाजे यांची ऑनबोर्ड दूरुस्ती करुन ती जहाजे मार्गस्थ करुन देवून जागतिक जहाज व्यवसायात कोकणच्या समुद्रात व्यापारी जहाजास कोकणतीही समस्या आली तर तेथे सेवा सुविधा उपलब्ध आहे, असा विश्वास निर्माण करण्यात मरिनर भाटकर यांनी यश मिळविले आहे.
प्रवासी वाहतूक आणि व्यावसायीक शिप वाहतूक : स्वतंत्र नियोजन आवश्यक
कोकणातील बंदरांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक आणि व्यावसायीक शिप वाहतूक हे दोन विषय स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या विकासाकरीता स्वतंत्रच नियोजन करणो योग्य राहील असे मत मरिनर भाटकर यांनी व्यक्त करुन कोकणातील बंदरांच्या माध्यमातून होणा:या गेल्या 3क् वर्षापूर्वीच्या प्रवासी वाहतूकीकडे लक्ष वेधले आहे. मोघललाईन्स आणि चौघुले स्टिमशिप्स या दोन कंपन्यांच्या माध्यमातून मुंबई ते गोवा दरम्यान प्रवासी वाहतूक चालत असे. मुंबई,जयगड,रत्नागीरी, मुसाकाझी,विजयदूर्ग,देवगड आणि पणजी या प्रमुख बंदरांतून ही प्रवासी वाहतूक चालत असे. यामध्ये दाभोळ आणि मालवण या दोन बंदरांत देखील काही बोटी जात असत. चौघुले स्टिमशिपच्या चंपावती, चंद्रावती,रोहीदास, सेंट अॅन्थनी आणि रत्नागीरी अशा पाच प्रवासी बोटींच्या माध्यमातून ही वाहतूक चालत असे. चौघुले स्टिमशिपची रोहीणी ही एक बोट होती, ती मालवण जवळच्या समुद्रात दुर्दैवाने बुडाल्याने मालवण बंदरातील प्रवासी वाहतूक बंद झाल्याचे त्यांनी सांगीतले.
कोकणाच्या सागरी विकासाचा अभ्यास
मरिनर भाटकर हे परदेशात व्यावसायीक शिप क्षेत्रत कार्यरत होते. कोकणाच्या सागरी विकासाच्या अभ्यासाकरीता त्यांनी तेथील नोकरी सोडून कोकणात ‘कोकण सेवक’ आणि कोकणशक्ती (सरिता) या बोटींवर जाणीवपूर्वक मरिन इंजिनिअरची नोकरी केली आणि येथील वास्तव जाणून घेतले आहे.
वेळेच्या मुद्यावर मुंबई-गोवा प्रवासी बोट सेवा सन 1988 मध्ये बंद झाली
मुंबई-गोवा दरम्यानची प्रवासी बोट सेवा हळूहळू करत सन 1988 मध्ये पूर्णपणाने बंद झाली. त्यामागील कारणो देखील समजून घेणो आवश्यक असल्याचे मरिनर भाटकर म्हणाले. जागतिक पातळीवरील आजवरच्या विकास प्रक्रीये प्रमाणोच कोकणातील ही प्रवासी वाहतूक बंद झाली आहे. मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरुन आज सकाळी 10 वाजता सुटणारी प्रवासी बोट पणजी(गोवा) येथे दुस:या दिवशी सकाळी 8 वाजता पोहोचत असे, म्हणजे या मुंबई-गोवा प्रवासाकरीता तब्बल 22 तास लागत असत. तरी या प्रवासी सेवेचा कोकण व गोवा वासीय वापर करित होते कारण त्यांच्याकडे दूसरा पर्याय नव्हता.
एसटीचे जाळे विस्तारले आणि चाकरमान्यांनी बोटीकडे फिरवली पाठ
महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या बसेस सुरु झाल्या. सन 198क् मध्ये एसटीचे कोकणातील गावांगावात जाळे पसरले आणि मुंबईतील चाकरमानी एसटीतून 7 ते 1क् तासात रत्नीगीरी आणि सिंधूदूर्गातील आपल्या गावांत थेट पोहोचू लागला आणि वेळेच्या बचतीच्या मुद्यावर चाकरमान्यांनी स्वाभावीकच मुंबई-गोवा बोटसेवेकडे पाठ फिरवल्याचा अनूभव त्यांनी सांगीतला.
महागडे तिकिट आणि सुविधांचा अभाव : दमाणीया बोट सेवाही बंद
अशाही परिस्थितीत, सन 1990 मध्ये दमाणीया कंपनीच्या माध्यमातून मुंबई-गोवा दरम्यान अल्यूमिनियम प्रवासी बोट सेवा सुरु केली. या बोटसेवेचे असणारे 1200 ते 1600 रुपये तिकीट चाकरमान्यांना परवडणारे नव्हते. त्याच बरोबर बंदरांवर प्रवांशांकरीता आवश्यक कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्याच बरोबर संपर्क यंत्रणा बोट व बंदर या दरम्यान नसल्याने बोट कधी येणार वा उशीर का झाला हे काहीच कळत नसल्याने अखेर या बोटीकडेही कोकणवासीयांनी पाठ फिरवली आणि ही बोट सेवा देखील अल्पावधीत बंद झाल्याचे त्यांनी सांगीतले.
कोकणात जिल्ह्यांतर्गत प्रवासी बोट सेवेची गरज, पर्यटन व्यवसायाला प्रचंड संधी
कोकणातील जिल्ह्यांतर्गत प्रवासी बोट सेवेला आजही मागणी असून तशी बोट सेवा सुरु केल्यास ती निश्चित चिरकाल चिकून कोकणवासीयांच्या कोकणांतर्गत प्रवासाची सोय सागरी मार्गातून होवू शकते. गोव्या मध्ये असणा:या दोन महत्वाच्या नद्या म्हणजे ‘मांडवी’ आणि ‘झुआरी’. मांडवी नदिवर गोव्यातील पर्यटन उद्योग आहे तर झुआरी नदिवर आयर्न ओअर(कच्चे लोखंड) वाहतूकीचा उद्योग आहे. परिणामी गोव्यातील अर्थव्यवस्था सक्षम होवू शकली आहे. एकटय़ा रत्नागीरी जिल्ह्यात पाच नद्या असून त्यांच्या अखेरीस बाणकोट,भाटय़े सारख्या मोठय़ा खाडय़ा आहेत. या नद्या आणि त्यांच्या खाडय़ांचा वापर गोव्या प्रमाणो पर्यटन व्यवसाय आणी व्यावसायिक बंदरांकरीता नियोजन बद्ध पद्धतीने केल्यास कोकणाच्या विकासाला वेळ लागणार नाही. सिंधूदूर्गात मालवण, तार्करली मध्ये हाऊसबोटींचा व्यवसाय देखील उभा राहातोय, तर रायगड जिल्हा मुंबईतील गेटवेऑफ ईंडीया येथून सुटणा:या पीएनपी कॅटामरिन बोटी व अन्य बोटींमूळे मुंबईचे उपनगर झाल्या सारखा आहे. भाऊच्या धक्क्याहून मोरा(उरण) ही प्रवासी सेवा गेल्या अनेक वर्षापासून सूरु आहे, त्यांचा विकास केल्यास मुंबई ते रायगड दरम्यानच्या रस्त्यांवरील वाहनांची वाहतूक कमी होवून डिङोल-पेट्रोलची देखील मोठी बचत होवू शकते, असा विश्वास मरिनर भाटकर यांनी व्यक्त केला आहे. येत्या काळात ‘क्रुझ बोटींची’ निर्मीती करुन पर्यटन व्यवसाय कोकणात वृद्धीगत करण्याची नियोजन मरिनर भाटकर यांचे असून त्यास शासनाकडून कसे सहकार्य मिळते याच्या प्रतिक्षेत ते असल्याचे त्यांनी अखेरीस सांगीतले.