मुंबई : शेअर बाजारातील जोरदार तेजीने सेन्सेक्सवरील प्रमुख १० कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांच्या बाजार भांडवलात गेल्या आठवड्यामध्ये १.३९ लाख कोटी रुपयांची वाढ नोंदली गेली. ओएनजीसी तथा रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या भांडवलात सर्वाधिक वाढ झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस वगळता आयटीसी, कोल इंडिया, एचडीएफसी बँक यासह नऊ कंपन्यांच्या भांडवलात एकत्रितपणे १,३९,६०४.२२ कोटी रुपये जमा झाले. बाजार भांडवलाच्या दृष्टीने टीसीएस अग्रस्थानी राहिली. आठवडाभराच्या काळात ओएनजीसीचे बाजारमूल्य ३१,८२६.४२ कोटींनी वाढून ३,२९,३४३.५९ कोटी रुपये झाले. बाजार भांडवलाच्या बाबतीत ओएनजीसीला सर्वाधिक लाभ झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल २६,८७६.२६ कोटींनी वाढून ३,४९,२४५.९३ कोटी रुपये राहिले. कोल इंडियाचे भांडवल २३,११७.९ कोटी रुपयांनी उंचावून २,१८,३२५.१४ कोटी रुपयांवर आले. भारतीय स्टेट बँकेचे बाजारमूल्य १८,०३७.२ कोटी रुपयांनी चढून १,८०,२४५.१४ कोटी रुपये झाले. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यांच्या बाजार भांडवलातही वाढ नोंदली गेली. आयटीसीचे बाजारमूल्य ९,५८३.५९ कोटी रुपयांनी वाढून २,८४,३६६.०६ कोटी रुपये, टाटा मोटर्सचे भांडवल ४,१८६.०९ कोटींनी चढून १,२१,१८०.०९ कोटी रुपये झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
१.३९ लाख कोटींनी वाढले बाजार भांडवल
By admin | Published: May 19, 2014 3:11 AM