शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मराठवाडा विद्यापीठात चालतोय ‘पीएच.डी’चा बाजार

By admin | Published: March 03, 2016 4:38 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी मिळविण्यासाठी चालणाऱ्या बाजाराची धक्कादायक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत

नजीर शेख,  औरंगाबादडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी मिळविण्यासाठी चालणाऱ्या बाजाराची धक्कादायक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. मार्गदर्शकाला ठरावीक रक्कम न दिल्यास किंवा त्याची सूचना न पाळल्यास विद्यार्थ्याचा छळ केला जात असल्याचा अनुभव साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते कवी वीरा राठोड यांनाही आला आहे. पीएच.डीसाठी दीड लाख रुपयांची मागणी एका महिला मार्गदर्शकाने केल्याचे नुकतेच समोर आले आहे. वीरा राठोड यांनी सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या मराठी विभागात डॉ. अशोक देशमाने यांच्याकडे पीएच.डीसाठी नोंदणी केली होती. प्रबंध पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी राठोड यांची अडवणूक करण्यात आली. यासंबंधी राठोड म्हणाले, मी ‘आत्माराम कणिराम राठोड यांच्या साहित्याचा अभ्यास’ हा विषय संशोधनासाठी घेतला होता. त्यावेळी दोन बाह्य परीक्षकांना बोलावण्यासाठी देशमाने यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. बाह्य परीक्षकांना पाकिटे (प्रत्येकी २५ हजाराचे एक) द्यावी लागतात. राहण्याचा आणि वाहनाचा सुमारे एक लाख रुपये खर्च सांगण्यात करावा लागतो, असे सांगण्यात आले. मी ही रक्कम देऊ शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे लेखी परीक्षा होते किंवा नाही, असे मला वाटू लागले. मी तत्कालीन कुलगुरूडॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याकडे तक्रार केली. मुलाखत प्रक्रिया झाली. मार्गदर्शकाने माझे खच्चीकरण होईल, अशीच वर्तणूक केली. त्यामुळे पीएच.डीच्या विद्यार्थ्यांची कशी छळवणूक होते, याचा प्रत्यय मला आला. वास्तव जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने डॉ. देशमाने यांच्याशी संपर्क करण्याचा तीन वेळा प्रयत्न केला. त्यांनी ‘नंतर फोन करतो’ असे सांगितले. मात्र, फोन केला नाही.पीएच.डीचा बाजार समोर आणणारी आणखी एका ‘आॅडिओ क्लिप’ ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील एका महिला मार्गदर्शकाविरुद्ध विद्यार्थ्याने विद्यापीठाकडे लेखी तक्रार आणि सोबत ‘आॅडिओ क्लिप’ सादर केली आहे. त्या ‘आॅडिओ क्लिप’ मधील काही अंश...विद्यार्थी : मॅडम, मी आलो होतो डिपार्टमेंटला.गाईड : पण मी निघाले; डिपार्टमेंटमधून ना.विद्यार्थी : अरे बा.. मग आता भेट..गाईड : सांगितले ना मघाशी. मला नितीनने काहीच सांगितले नाही. सहा महिने झाले. बस आता रखडत. विद्यार्थी : नाही मॅडम, मी कॉलेजलाच होतो. गाईड : हो, मी उशिरा येणार होते. माझ्या घरचं काम झालं नाही. माझ्या घरची मोटार जळाली. विद्यार्थी : सर म्हणाले, थोडे उशिरा येणार आहेत त्या...गाईड : आता तू घरी आलास तर मोटारचे काम चालू असल्याचे दिसेल.विद्यार्थी : मी घेऊन येऊ का कॉपी, तुमच्या घरी.गाईड : चेक घेऊन येणार असशील तर आणि बाकी डिटेल घेऊन येणार असशील तर ये. विद्यार्थी : चेक मिळून जाईल ना; परवा करूचेकचे काम. गाईड : नाही नाही. चेक ‘क्लीअर’ होईल तेव्हाच मी सही करीन. विद्यार्थी : मॅडम उशीर होईल खूप मला. गाईड : तुला किती दिवसांपासून सांगत आहे. मी काय तुझ्याकडे भीक मागत आहे का?विद्यार्थी : नाही हो नाही...( हा संवाद, आॅगस्ट २०१५ मधील असून, या विद्यार्थ्याला अजून पीएच. डी मिळालेली नाही.)