पारोळ/वसई : वसई पूर्व भागातील शिवणसई येथे गावकऱ्यांनी चंद्रकांत भोईर यांच्या रास्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विकण्याचा कट उधळून आरोपी राजाराम पटेल रा. जाबरपाडा (वसई) याला मुद्देमालासह पकडून मांडवी पोलिसांच्या ताब्यात दिले.शुक्रवारी दुपारच्या सुमारास भोईर यांच्या रास्त धान्य दुकानातील धान्याची पोती पटेल टेम्पोमध्ये धान्याच्या गोणी भरत असल्याचे गावाकऱ्या समजताच त्यांनी टेम्पोची पाहणी केली. यावेळी या टेम्पोमध्ये रेशनिंगचे धान्य भरले असल्याचे गावाकऱ्यांच्या लक्षात आले. त्यावेळी टेम्पो मध्ये ५० किलो गव्हाच्या आठ गोणी भरल्या होत्या. गवाकऱ्यांनी तत्काळ या प्रकरणाची माहीती मांडवी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थाळाची पाहणी करुन आरोपींना ताब्यात घेतले. तसेच पुरवठा अधिकारी वसई यांनी मांडवी पोलिस दुरक्षेत्रामध्ये या प्रकरणाचा पंचनामा करुन पोलिसाना अहवाल दिला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक निरीक्षक रायपुरे करीत आहेत.पालघर जिल्हात कुपोषणात बळी जात असताना गरिबांच्या तोंडचे अन्न पळवून जास्त भावात दुकानात विकाणाऱ्या टोळ्या वसई तालुक्यात सक्र ीय आहेत. पेल्हार, नालासोपारा परिसरात हा गोरख धंधा मोठया प्रमाणात चालतो. या बाबीला आळा बसावा म्हणुन धान्य पुरवठा विभागाही कमी पडत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)
बाजारात जाणारे रेशन पकडले
By admin | Published: September 18, 2016 2:04 AM