नवी दिल्ली : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून या काळातली ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी चांगली मागणी झाल्याने शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रतितोळा ८० रुपयांच्या तेजीसह ३०,४८० रुपये झाला. दुसरीकडे औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून चांगली मागणी न मिळाल्याने चांदीचा भाव २३० रुपयांच्या हानीसह ४१,७७० रुपये प्रतिकिलो झाला. बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नसराईच्या हंगामातली ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी स्टॉकिस्टांकडून मागणी झाल्याने सोन्याचे भाव वाढले. मात्र, औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी न मिळाल्याने चांदीच्या भावात घट नोंदली गेली. दिल्ली बाजारात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ८० रुपयांच्या तेजीसह अनुक्रमे ३०,४८० रुपये आणि ३१,२८० रुपये प्रतिकिलो झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २५,१०० रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव २३० रुपयांनी कमी होऊन ४१,७७० रुपये झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क) चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव २३० रुपयांनी स्वस्त होऊन ४१,६७० रुपये प्रतिकिलोवर आला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव एक हजार रुपयांनी घटून ७९,००० ते ८०,००० रुपयांच्या पातळीवर बंद झाला.
सोन्याला लग्नसराईचा लाभ
By admin | Published: May 10, 2014 12:01 AM