पिंपरी : यंदा १६ नोव्हेंबरपासून विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा प्रत्येक महिन्यात एकूण ८० मुहूर्त आहेत. लग्न निश्चित झालेल्या कुटुंबीयांनी मंगल कार्यालये, आचारी, मंडप, बॅण्ड बुकिंगला आतापासूनच सुरुवात केली आहे. तुलसीच्या विवाहाला ११ नोव्हेंबरपासून सुरुवात झाल्यानंतर १६ पासून लग्नाचा मुहूर्त आहे. १६ नोव्हेंबर ते जुलै २०१७ अखेर एकूण ८२ मुहूर्त आहेत. गेल्या वर्षी मुहूर्त कमी होते. मे महिन्यांत तर एकच मुहूर्त होता. यंदा मात्र, नोव्हेंबरपासून जुलैपर्यंत प्रत्येक महिन्यात मुहूर्त आहेत. सर्वाधिक मुहूर्त मे आणि जून महिन्यात आहेत. विशेष म्हणजे या वर्षी शुक्र अस्त नसल्यामुळे लग्न सोहळ्या बरोबरच इतर शुभकार्येही नागरिकांना करता येणार आहेत. प्रत्येक महिन्यात लग्नतिथी असल्यामुळे वधू-वर कुटुंबीयांनी आपल्या सोयीनुसार लग्नाच्या तारखा आरक्षित केल्या आहेत. याबरोबरच शहरातील सर्व लहान-मोठी मंगल कार्यालये, लॉन्स यांचेदेखील बुकिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यंदाचे मुहूर्त नोव्हेंबर - १६, २१, २२, २५, २६डिसेंबर- १, ३, ४, ५, ६, ८, १४जानेवारी -१७, १८, १९, २०, २३, २४, २९फेब्रुवारी - १, २, ३, ५, ६, ११, १३, १४, १६, १७, १९, २१, २८ मार्च -१, २, ५, ६, १०, ११, १४, १५, १६, १८एप्रिल - १७, १९, २०, २१ मे - ४, ७, ८, ९, १४, १६, १७, १८, १९, २१, २२, २३, २७, ३१ जून- २, ३, ५, ६, ८, १०, १२, १३, १५, १७, १८, १९, २०, २८, ३०जुलै - १, २, ३ तुलसी विवाहनंतर प्रत्येक महिन्यात मुहूर्त आहेत. मागील वर्षी शुक्र अस्त व कोकीळव्रत असल्यामुळे मुहूर्त कमी होते. यंदा मात्र कोणतेही शुक्र अस्त नाही.- सतीश मोरेश्वर कुलकर्णी, वाकडमुहूर्त अधिक असल्याने मंगल कार्यालयाचे बुकिंग झाले आहे. लग्न जमल्यानंतर बहुतांश नागरिक पहिल्यांदा कार्यालय बुकिंग करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे वधू-वरांच्या मंडळीनीं आतापासून मंगल कार्यालय बुकिंग करून ठेवले आहे. - रामदास टेमघरे, मंगल कार्यालय चालक, थेरगाव. शहरात मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालये असल्यामुळे मंडपाचा वापर कमी होतो. ग्रामीण भागात मात्र, मंडपातच कार्यक्रम होतात. यंदा मागील वर्षापेक्षा जास्त मुहूर्त असून, आतापासूनच वधू-वर मंडळीकडून मंडपची बुकिंग सुुरू झाली.- कुणाल वावळकर, मंडप अॅण्ड डेकोरेटर्स, वाकड.
विवाह मुहूर्त १६ नोव्हेंबरपासून
By admin | Published: November 07, 2016 1:11 AM