वाडा : तालुक्यातील तुसे येथे लग्नात हेलिकॉप्टरची हौस भागविली नाही म्हणून सुनेचा मानसिक व शारीरिक छळ करणार्या शहापूरमधील सावंत कुटुंबाविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर २००९ रोजी नीलम देशमुख हिचा विवाह आकाश सावंत याच्याशी झाला होता. आकाश व त्याच्या कुटुंबाने लग्नाचा खर्च व लग्नासाठी हेलिकॉप्टर, ४० तोळे सोन्याचे दागिने अशी मागणी केली होती. एवढेच नव्हे तर, साखरपुड्याच्या दिवशी दागिने खरेदी करण्यासाठी २ कोटी ७५ लाख रुपयांची मागणी केली होती.नीलमच्या कुटुंबियांनी लग्नात २० लाख खर्च केला. परंतु हंुड्याची मागणी पूर्ण न झाल्याने सावंत कुटुंबियांनी नीलम हिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्याला कंटाळून नीलमने आकाशसह सासरे अशोक, सासू अश्विनी, दीर सागर, शिवतेज, अरुण तसेच अन्य चौघांविरोधात वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (वार्ताहर)
हेलिकॉप्टर सफरीच्या हौसेसाठी विवाहितेचा छळ
By admin | Published: May 13, 2014 9:50 PM