शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

लग्न करताय?... थांबा! प्रिमॅरिटल काउन्सेलिंग जरूर करा!

By admin | Published: March 14, 2016 1:29 AM

दोघांनी एकमेकांना पसंत केलं... दोघांनाही आपण ‘मेड फॉर इच अदर’ असल्यासारखं फिलिंग आलं... बघता बघता साखरपुडाही झाला... आणि अचानक दोघांना एकमेकांमध्ये काहीतरी हरवल्यासारखं

नम्रता फडणीस/सायली जोशी, पुणेदोघांनी एकमेकांना पसंत केलं... दोघांनाही आपण ‘मेड फॉर इच अदर’ असल्यासारखं फिलिंग आलं... बघता बघता साखरपुडाही झाला... आणि अचानक दोघांना एकमेकांमध्ये काहीतरी हरवल्यासारखं जाणवायला लागलं... आपण थोडं थांबून जरा विचार करू या... लग्नाची घाई नको करायला, असं दोघांनीही वाटलं... आणि दोघांचं लग्न तुटलं... हे काहीसं प्रातिनिधिक उदाहरण असलं तरी आज अनेक जोडपी आहेत; ज्यांची साखरपुडा झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर आणि अगदी एक किंवा दोन मुले झाल्यावरही आपण राहू शकत नाही अशी भावना मनात आल्यामुळे लग्नाचे बंध तुटले आहेत. मात्र वेळ निघून गेल्याचे जाणवते.समाजात हे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. दोघांना असे का वाटले? जोडीदारामध्ये त्या नक्की काय शोधत आहेत, एकमेकांकडून त्यांच्या अपेक्षा कोणत्या आहेत? का फक्त शारीरिक आकर्षण आहे? या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्नच जोडप्यांकडून केला जात नाही. त्यामुळे समाजात लग्न तुटणे, घटस्फोट होणे यांसारख्या माध्यमातून नाती दुरावत असल्याचे आपल्यासमोर येते. परंतु या नवरा-बायकोच्या नात्यांचा प्रवास समजावून घेण्यासाठी ‘प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंग’ होणे आवश्यक असल्याचे समुपदेशकांचे म्हणणे आहे. लग्न म्हणजे खेळ नसतो, तो दोन जिवांचा मेळ असतो. दुकानामधून एखादी गोष्ट विकत घेण्यापूर्वी आपण किती बारीकसारीक गोष्टींचा विचार करतो, मग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आनंदी क्षण ठरणाऱ्या लग्नाबद्दल जोडप्यांकडून एकमेकांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, स्त्री-पुरुष म्हणून एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा यांचा का विचार केला जात नाही? तो केला असता तर लग्न तुटणे, घटस्फोटासारख्या परिणामांना सामोरे जाण्याची वेळ आलीच नसती. आज कितीतरी जोडपी अशी आहेत, ज्यांना निवडलेल्या जोडीदाराबरोबर लग्न करण्याचा पश्चाताप होत आहे. विसंवादामुळे कितीतरी जोडप्यांची लग्ने मूल झाल्यावरही संपुष्टात आली असल्याचे दिसते. परंतु, ही वेळ येऊच नये यासाठी जोडप्यांचे ‘प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंग’ होणे ही काळाची गरज बनली आहे. लग्नापूर्वी समुपदेशन करणारे समुपदेशकच याची समाजातील आवश्यकता अधोरेखित करतात. काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंग’चे अभ्यासक्रमही राबविले जात आहेत, हे त्यातील विशेष!> प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंगचे अनेक फायदेस्त्री व पुरुष किंवा व्यक्तिमत्त्व म्हणजे काय, हे कळते.नवरा कसा आहे - आक्रमक की मृदू? अथवा बायको कशी आहे हळवी की रोमॅन्टिक? त्या दोघांच्या स्वभावाचे गुणधर्म काय, हे समजायला मदत होते.तिच्या किंवा त्याच्या कोणत्या स्वभावाशी मी तडजोड करू शकतो? हे आधीच ठरवता येऊ शकते.लग्नानंतर वादाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता निर्माण होते. विवाहसंस्था टिकण्यास हातभार लागू शकतो. > प्रिमँरेटिअल काउन्सिलिंगची गरज का? लग्न या संकल्पनेबाबत योग्य ते ज्ञान मिळावेनातेसंबंधांबाबत पुरेसे मार्गदर्शन व्हावेसहनशक्ती आणि एकमेकांबद्दल आदर निर्माण व्हावाभविष्यात आपल्याला काही तडजोडी करायच्या आहेत याची जाणीव व्हावीएकमेकांची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती समजावीस्वभाव समजून घेऊन त्यानुसार कृतिशीलतेकडे पाऊल पडावेभविष्यात आपल्यापुढे असणारी कौटुंबिक आव्हाने अवगत व्हावीत