दौंड : मुंबईत रेल्वेत चोऱ्या करणारी हरियाणातील टोळी दौंडमध्ये (जि. पुणे) जेरबंद करण्यात आली. या टोळीकडून काही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. अशोक शेरसिंग (३८), रामधारी विजयपाल (४२), सुरेश भूषणलाल (४२), मनोज श्रीपाल (३२), सत्वीर बरशा (३५) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. हे संशयित आरोपी दौंड येथे लॉजवर असल्याची माहिती मुंबई रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक राहुल उडाणशिवे यांना मिळाली होती. मुंबई पोलिसांनी व्हॉट्स अॅपवर त्यांची छायाचित्रे दौंड पोलिसांना पाठविली. उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या पथकाने आरोपींना पकडले.
मुंबईत चोऱ्या करणारी टोळी दौंडमध्ये जेरबंद
By admin | Published: October 21, 2015 2:27 AM