शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

शहादत की कोई किमत नहीं होती

By admin | Published: February 21, 2016 3:37 AM

‘‘केंद्रीय विद्यापीठांवर तिरंगा फडकावण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावरून देशभर वादंग निर्माण केले जात आहे. तिरंगा फडकावण्यासाठी किती खर्च केला जाणार, यावर चर्चा रंगत आहेत. तसे

स्मृती इराणी झाल्या भावनिक : तिरंग्यासंदर्भात उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना दिले सडेतोड उत्तरपुणे : ‘‘केंद्रीय विद्यापीठांवर तिरंगा फडकावण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावरून देशभर वादंग निर्माण केले जात आहे. तिरंगा फडकावण्यासाठी किती खर्च केला जाणार, यावर चर्चा रंगत आहेत. तसे प्रश्नही मला विचारले जात आहेत; पण तिरंग्याची खरी किंमत जाणून घ्यायची असेल, तर देशासाठी शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना विचारा. या सर्वांच्या दृष्टिकोनातून तिरंग्याकडे पाहिल्यानंतर त्याची किंमतच केली जाऊ शकत नाही, हे उमजेल. ‘क्योंकि, शहादत की कोई किमत नहीं होती,’’ अशी भावना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केली.‘लोकमत आयकॉन्स आॅफ एज्युकेशन महाराष्ट्र’ या कॉफीटेबल पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी दिलखुलासपणे चर्चा केली आणि आपल्या भावनांना वाट करून दिली.‘‘राजकारण आणि पत्रकारितेमध्ये एक धूसर रेषा आहे. हे मला गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये माझ्यावरून येणाऱ्या हेडलाईन्सवरून दिसून येत आहे,’’ असे सांगून इराणी म्हणाल्या, ‘‘केंद्रीय विद्यापीठांमध्ये तिरंगा फडकावण्याचा निर्णय घेतल्यावर स्मृती इराणींनी असा निर्णय का घेतला, यावर खूप चर्चा झाली. पण, जेव्हा या विद्यापीठांच्या कुलगुरूंची मी बैठक घेतली त्या वेळी त्यांनी जगाला भारताची एकात्मता दाखविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विद्यापीठाने सशक्त विद्यार्थी घडविणे गरजेचे आहे, जे पुढे जाऊन सशक्त समाज घडवतील. त्यासाठी राष्ट्रभक्ती असायला हवी. त्यामुळेच तिरंगा फडकावण्याची कुलगुरूंनी केलेली मागणी मान्य करण्यात आली. तिरंगा लावण्याबाबतचा हिशेब करण्यास सुरुवात केली. तिरंग्याच्या किमतीवरून चर्चा सुरू झाली. एका पत्रकाराने मला विचारले, की विद्यापीठांमध्ये फडकावण्यात येणाऱ्या तिरंग्यासाठी किती किंमत मोजावी लागेल. काही म्हणाले ५० लाख, तर काहींनी एक कोटी रुपये खर्च येईल, असे सांगितले. मी म्हणाले, ‘तिरंग्याची खरी किंमत करायची असेल, तर ज्याचा मुलगा सीमेवर शत्रूंशी लढताना शहीद झाला, त्याच्या कुटुंबाला विचारा तिरंग्याची किंमत काय आहे? मुंबईत २६/११ मध्ये शहीद झालेल्यांच्या कुटुंंबीयांना विचारा, स्वातंत्र्यसंग्रामात लढलेल्या त्या स्वातंत्र्यसैनिकांना विचारा, ज्यांना कितीही पेन्शन मिळत असले तरी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी कमीच आहे. यांना विचारा तिरंग्याची खरी किंंमत.’’ जेव्हा या सर्वांच्या दृष्टिकोनातून आपण तिरंग्याकडे पाहू, तेव्हा आपल्याला समजेल, की तिरंगा अमूल्य आहे, अशी भावना इराणी यांनी या वेळी व्यक्त केली.शिक्षणासमोरील आव्हाने शिक्षणासमोरील आव्हानांचा विचार करताना जाणवते, की आज शिक्षणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहायचे की ज्या संस्था मोठ्या आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या नजरेतून पाहायचे? की ज्यांच्याकडे काहीही नसताना त्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देत चांगला समाज घडविण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्या नजरेने शिक्षणाकडे पाहायचे? याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे, अशी भावना स्मृती इराणी यांनी व्यक्त केली. ‘मी भूतकाळाकडे न पाहता भविष्याकडे पाहून मार्गक्रमण करेन; पण ते करीत असताना वर्तमानाचा विसर पडू देणार नाही,’ असे विचार केनेडी यांनी मांडले होते. ते विचार आज आपण आपल्या शिक्षणव्यवस्थेत प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे. एकत्र येऊन जर आपण काम केले, तर देशाला सशक्त बनवू शकतो. पक्षपात सहन करणार नाहीआंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकनांसाठी चुकीचे पायंडे पाडण्यात आले आहेत. संस्थेत शिक्षण चांगले मिळत असेल, तरी परदेशी विद्यार्थ्यांची संख्या पाहिली जाते. ती नसेल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय मानांकनात स्थान मिळत नाही. अशा प्रकारचा पक्षपात भारतातील कोणत्याही सरकारी शिक्षणसंस्था किंवा खासगी संस्थांबरोबर केलेला सहन केला जाणार नाही. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार भारतातील शासकीय व खासगी संस्थांची गुणवत्ता जगासमोर आणण्यासाठी आणि ताकद दाखवून देण्यासाठी ‘नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग सिस्टीम’ तयार करण्याचे काम सुरू आहे. परीक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षकांना बोलावले.