शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: विराट-रोहितने लाखोंच्या जनसमुदायासमोर एकत्र जल्लोष करून ट्रॉफी उंचावली तेव्हा...
2
राम मंदिरातील पुजाऱ्यांचं वेतन ठरलं, थेट खात्यात जमा होणार पैसे! अँड्रॉइड फोनचीही परवानगी, पण...
3
“कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे”: अमोल कोल्हे
4
Team India Arrival LIVE: 'वानखेडे'वर पोहोचताच विराट-रोहितचा जबरदस्त डान्स!
5
मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...
6
कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला, सरकारने मालकाला थेट तुरुंगात पाठवला, कारण वाचून बसेल धक्का
7
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा; पीएम मोदींना देणार आव्हान...
8
“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका
9
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
10
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
11
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
12
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
13
Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज
14
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका
15
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार
16
“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान
17
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली CM पदाची शपथ
18
"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार, परराष्ट्र मंत्रालयाने तारीख सांगितली
20
"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"

मशिदीत गणेशोत्सव

By admin | Published: September 18, 2015 2:57 AM

येथील झुंझार चौकात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची गेल्या ३५ वर्षांची परंपरा न्यू गणेश तरुण मंडळाने

- प्रतापसिंह माने,  गोटखिंडीगोटखिंडी (ता. वाळवा) येथील झुंझार चौकात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची गेल्या ३५ वर्षांची परंपरा न्यू गणेश तरुण मंडळाने आजही जपली आहे. यावर्षी इस्लामपूर विभागाच्या पोलीस उपविभागीय अधिकारी वैशाली शिंदे यांच्याहस्ते गुरुवारीगणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.गेल्या ३५ वर्षांपूर्वी म्हणजे १९८० मध्ये येथील ज्येष्ठ जाणकरांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले; पण त्याकाळात अतिपाऊस असल्याने गणपतीची प्रतिष्ठापना कोठे करावयाची, हा प्रश्न निर्माण झाला. त्यावर हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित येऊन मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून प्रत्येकवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना मशिदीमध्ये करण्याची परंपरा जपली आहे. मुस्लिम बांधव दररोज एकत्रित येऊन गणपतीची आरती करतात, तर मुस्लिमांचा रोजा हिंदू बांधव करीत असतात. गणेशोत्सव काळात मुस्लिम बांधव मांसाहार करीत नाहीत. १९८२ मध्ये मोहरम व गणेशोत्सव एकाचवेळी आल्याने एकाच ठिकाणी श्री गणेशमूर्ती व पंजाची स्थापना करण्यात आली होती. येथील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित उत्सव साजरे करून गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. यंदा या न्यू गणेश मंडळाने झुंझार चौक ते अमृतेश्वर देवालयापर्यंत विद्युत रोषणाई केली आहे. गणेशोत्सव काळात दररोज सामाजिक, पौराणिक नाटिका सादर केल्या जातात. मंडळाने रक्तदान, वृक्षारोपणासारखे अनेक उपक्रम राबविले आहेत.‘ईद’ला कुर्बानी नाहीयावर्षी गणेशोत्सव काळातच मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आला आहे; पण येथील मुस्लिम बांधव ईदला फक्त नमाज पठण करणार आहेत. ‘कुर्बानी’ करणार नाहीत, असे मुस्लिम बांधवांनी सांगितले.