शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

महिलेवर सामूहिक अत्याचार

By admin | Published: October 17, 2014 1:03 AM

शस्त्राचा धाक दाखवून एका निराधार महिलेवर दोन नराधमांनी पाशवी अत्याचार केला. आज पहाटे २.४० च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली.

शस्त्राचा धाक : दोघांचे कृत्य, हुडकेश्वरमध्ये खळबळनागपूर : शस्त्राचा धाक दाखवून एका निराधार महिलेवर दोन नराधमांनी पाशवी अत्याचार केला. आज पहाटे २.४० च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. हुडकेश्वरमध्ये महाकालीनगर झोपडपट्टी आहे. येथे मजुरांच्या झोपड्या आहेत. अशाच एका झोपडीवजा घरात पीडित महिला राहते. ती मूळची छत्तीसगडची आहे. तिच्या पतीचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले. तिला १३, १० आणि ८ वर्षांची तीन मुले आहेत. पीडित महिला मोलमजुरी करून आपले व मुलांचे पोषण करते. आज पहाटे २.४५ च्या सुमारास दोन नराधम तिच्या घरात शिरले. पीडित महिलेला जागे करून आरोपींनी तिला चाकूसारख्या शस्त्राचा धाक दाखवला. ओरडल्यास ठार मारू,अशी धमकी देत आरोपींनी तिला घरातीलच भिंतीपलीकडे (किचनमध्ये) नेले. तेथे दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. ‘कुणाला काही सांगू नको, आम्ही पुन्हा येऊ‘ असे म्हणत आरोपी पळून गेले. आरोपी दूरवर निघून गेल्याची खात्री पटल्यानंतर ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास पीडित महिलेने ‘चोर .. . चोर .. . ‘ म्हणून आरडाओरड केली. त्यामुळे शेजारची मंडळी जागी झाली. यावेळी पीडित महिलेने चाकूच्या धाकावर दोन आरोपींनी आपले ५ हजार रुपये लुटून नेले‘,असे शेजाऱ्यांना सांगितले. नंतर मुलांना घेऊन झोपी गेली.वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षापोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. तिला वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकलला पाठविले. हा प्रकार उघड झाल्यानंतर परिसरात आणि पोलीस प्रशासनातही खळबळ उडाली. पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांनी घटनास्थळी भेट देऊन महिलेसोबतच आजूबाजूच्यांकडेही या घटनेबाबत चौकशी केली. पीडित महिला प्रचंड दडपणात आहे. प्रारंभी तिने या घटनेची माहिती सांगण्यास टाळाटाळ केली. नंतर मात्र सामूहिक अत्याचार झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस संभ्रमात आहेत. त्यांनी गुन्हा तर दाखल केला. मात्र, पोलिसांना वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलीस उपायुक्त सिंधू स्वत: पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात पोलीस होते. डॉक्टरांकडून अहवाल आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)असा झाला उलगडानेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर पीडित महिला आपल्या घरातील कामे उरकून स्वयंपाक करू लागली. सकाळी ८.३० च्या सुमारास झोपडपट्टीतील एकाने १०० क्रमांकावर फोन करून झोपडपट्टीत लुटमार झाल्याची माहिती दिली. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने हुडकेश्वर पोलिसांना कळविले. त्यानुसार, ठाणेदार तुकाराम मुंढे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. झोपडीतून चोरट्यांनी ५ हजार रुपये लुटून नेल्याची बाब त्यांना खटकली. त्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पीडित महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस करायला लावली. त्यानंतर पीडित महिलेने सामूहिक अत्याचाराची वाच्यता केली. दोन संशयित ताब्यात निवडणुकीची धामधूम संपायला असताना घडलेल्या या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे पोलिसांचेही धाबे दणाणले आहे. पीडित महिलेने सांगितलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी आज या झोपडपट्टीसोबतच आजूबाजूच्याही झोपडपट्ट्यांमध्ये शोधमोहिम राबवली. सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. महिलेला मेडिकलमधून परत आणल्यानंतर तिच्याकडून संशयितांची ओळखपरेड करवून घेतली जाणार आहे.