शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

वसई, विरारमध्ये भाजीपाला प्रचंड महागला

By admin | Published: June 06, 2017 2:44 AM

भाजीपाला व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत न झाल्याने वसई विरारमध्ये भाजीपाला महागला आहे

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : शेतकऱ्यांच्या संप माघारी बाबतच्या संभ्रमामुळे अजूनही येथील भाजीपाला व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत न झाल्याने वसई विरारमध्ये भाजीपाला महागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दुध पुरवठा बंद झाल्याने लोकांचे हाल होऊ लागले आहेत. सोमवारच्या बंदमुळे मंगळवारी दूध येणार नसल्याचे वितरकांनी सांगितले. तर गहू, तांदुळ आणि कडधान्याची आवक निम्म्याहूनही कमी झाल्याने त्याची झळ वसईकरांना सोसावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या संपामुळे भाजीपाला मिळत नसल्याचा फायदा चिकन आणि मटण विक्रेत्यांना होऊ लागला आहे. दोन दिवसात चिकन आणि मटणचे दर काही प्रमाणात वाढलेले दिसून आले. १ जूनपासून शेतकरी संपावर गेल्याचा परिणाम वसईत आता जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाजीपाल्याची आवक एकदम कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर तीनपट वाढले आहेत. वसईत दररोज साधारण चौदाशे टन भाजीपाल्याची आवक होते. दोन दिवसांपासून ही आवक निम्म्याहून कमी झाली आहे. तर सोमवारी शेतकऱ्यांनी बंद पाळल्याने वसईत भाजीपाल्याचे ट्रक आले नाहीत. त्यामुळे वसईतील अनेक बाजारपेठा आज बंद होत्या. भाजीपाला नसल्याने किरकोळ विक्रेत्यांनी दरात प्रचंड वाढ केली . आवक प्रचंड प्रमाणात घटल्याने भाजीपाल्याचे दर तीनपटीने वाढले आहेत. त्याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसू लागला आहे. टोमॅटो, सिमला मिरची, फरसबी, हिरवा वाटाणा, मिरची, लिंबू, कोथिंबीर, मिरची, गाजर, काकडी याची मागणी हॉटेलमध्ये जास्त प्रमाणात असते. नेमक्या याच भाज्यांचे दर तीनपट वाढल्याने आर्थिक फटका बसू लागला आहे, अशी माहिती हॉटेल व्यावसायिक संतोष शेट्टी यांनी दिली. भाजीपाल्यासह तांदूळ, गहू आणि कडधान्याच्या पुरवठ्यावर मोठ्या परिणाम होऊ लागला आहे. संपापूर्वी वसईत दररोज तांदूळ २ हजार ८०० टन आणि गहूची १ हजार २०० टन इतकी आवक होती. संपामुळे तांदूळ, गव्हासह कडधान्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. सोमवारी गहू २९० टन आणि तांदूळ ५५० टन इतकाच वसईच्या बाजारात आला होता., अशी माहिती वसई तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली. तांदूळ, गहू आणि कडधान्याचे दर अद्याप स्थिर असले तरी संप असाच सुुरु राहिला तर मात्र त्यांचेही दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. वसई विरार परिसरात दररोज साधारण तीन लाख लिटर पिशवीच्या दुधाचा पुरवठा होतो. हे दुध नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादकांकडून पुरवले जाते. शेतकऱ्यांच्या संपामुळे दूध पुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दुधाची आवक चाळीस टक्क्यांनी घटली आहे. तर सोमवारी बंद असल्याने मंगळवारी दूध मिळणार नसल्याचे दूध उत्पादकांनी सांगितल्याने वसई विरारकांना मंगळवारी पिशवीचे दूध मिळणार नाही, अशी माहिती वसईतील दूध वितरक प्रशांत चौबळ यांनी दिली. महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक संघासह गोवर्धन, गोकुळ, गोदावरी, प्रभात, क्रिष्णा, हॅरिटेज यांचे दूध वसई विरार परिसरात जास्त प्रमाणात वितरित होते. नेमक्या याच उत्पादकांच्या दूध वितरणावर परिणाम झाल्याने वसईत दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे.जेवण आणि नाश्त्यासाठी लागणाऱ्या भाजीपाल्याचे घाऊक दर तीन पटीने वाढले आहेत. त्यात दूधाचा तुटवडा असल्याने पंचाईत झाली आहे. बाहेर भाजी खरेदी करण्यापेक्षा हॉटेलमधील जेवण स्वस्त असल्याने ग्राहक सध्या हॉटेलमध्ये जेवणे पसंत करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. भाजीपाला महागला तरी दर वाढवलेले नाहीत.-संतोष शेट्टी, हॉटेल व्यावसायिकदोन दिवसांपासून अनियमित आणि कमी दूध पुरवठा होऊ लागल्याने दुधाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच सोमवारच्या बंदमुळे मंगळवारी दूध पुरवठा होणार नाही. संपाबाबतचा संभ्रम दूर होत नाही तोपर्यंत वसईतील दुध पुरवठा पुर्ववत होणार नाही. त्याचा त्रास वसईकरांना सहन करावा लागणार आहे.-प्रशांत चौबळ, दूध वितरकशेतकऱ्यांच्या संपामुळे तांदूळ आणि गहूची आवक निम्म्याहून कमी झाली आहे. ती सुधारेपर्यंत दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.-प्रकाश पाटील, उपाध्यक्ष, वसई तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतलासरी शंभर टक्के बंदतलासरी : शेतकऱ्याच्या संपाला पाठींबा देण्यासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला तलासरीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला, तलासरी, उधवा गावातील सर्व बाजार पेठ बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी सहकार्य केले. तलासरीत सोमवार हा आठवडा बाजारचा दिवस परंतु बंद मुळे बाजार भरला नाही त्याचा फटका आदिवासींना बसला. आठवड्याचा भाजीपाला व इतर खरेदी साठी आलेल्यांना हात हलवीत परत जावे लागले. >भाजीपाल्याचे सोमवारचे घाऊक दर (किलोमध्ये)भाज्या संपापूर्वी सोमवारचे दर टोमॅटो १२ रुपये ६० रुपयेसिमला मिरची ४० ते ४५ रुपये ९० ते १०० रुपये फरसबी ३० रुपये ८० रुपये हिरवा वटाणा ३० रुपये ८० रुपये काकडी १६ रुपये ४० रुपये गाजर ३५ रुपये ९० रुपये भेंडी ३० रुपये ७० रुपये वांगी २० रुपये ४५ रुपये कोथिंबीर २५ रुपये जुडी ८० रुपये जुडीलिंबू १८० रुपये १०० नग ३०० रुपये १०० नग>बोईसरला भाजीपाल्याची प्रतिदिन २० टन आवक घटलीबोईसर: या शहरातील भाजीपाल्याची आवक प्रतिदिन २० टन घटली असून सुरतेहून येणारा तुटपुंजा भाजीपाला आणि स्थानिक किरकोळ भाजीपाल्यावरच सध्या नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे मात्र तारापूर एम आय डी सी तील अमूल कंपनीत गुजरात राज्यातून येणाऱ्या दुधामुळे दुधाचा पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही.बोईसारला ४ ते ५ मोठे भाजीपाल्याचे घाऊक (होलसेल) व्यापारी असून या सर्वांकडे नाशिक जिल्ह्यातिल पंचवटी मार्केट, सुरत, वाशी मार्केट, आणि स्थानिक छोट्या छोट्या शेती बागायती इत्यादी ठिकाणाहून विविध प्रकारचा सुमारे २० टन भाजीपाला प्रतिदिन येत असतो. परंतु सर्वत्र शेतकऱ्यांच्या संपामुळे भाजीपाल्याची आवक घटली . भाजीपाल्याच्या तुटवडया मुळे बोईसर व परिसरातील लाखो नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकही त्रस्त झाले असून सुकलेला आणि शिळा भाजीपाला चढ्या भावाने विकला जातोय त्याचप्रमाणे लग्न सोहळ्यात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत असल्याने भाजीपाल्याची आवक कधी वाढते व पुरवठा सुरळीत होतो याकडे लक्ष लागले आहे.