शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

मीरा रोड बनावट कॉल सेंटर प्रकरणातील मास्टरमाईंड गजाआड

By admin | Published: April 08, 2017 8:19 AM

मीरा रोड येथील बनावट कॉल सेंटर प्रकरणातील मास्टरमाईंड सागर ठक्कर उर्फ शॅगीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 8 -  मीरा रोड येथील बनावट कॉल सेंटर प्रकरणातील मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.  सागर ठक्कर उर्फ शॅगी याला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला 13 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.
 
मीरा रोडमधल्या बनावट कॉल सेंटर प्रकरणी अमेरिकेनं 61 भारतीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 20 जणांना अमेरिकेतच अटक करण्यात आली आहे. मीरा रोड भागातील 7 बनावट कॉल सेंटर्सच्या माध्यमातून तब्बल 6 हजार 400 अमेरिकन नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
 
मीरा रोड भागातील या 7 बनावट कॉल सेंटरवर 4 ऑक्टोबर 2016 रोजी रात्री पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. रॉयल कॉलेज शेजारील डेल्टा बिल्डिंगमधून तब्बल 700 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ठाणे गुन्हे शाखेच्या 200 पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली होती. देशात कॉल सेंटरवर पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याचं सांगितलं जातं आहे.
 
काय आहे नेमकं प्रकरण
अमेरिकन नागरिकांकडून करोडो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार 2016 करण्यात आली होती. मार्च महिन्यात १०० कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती.  फसवणुकीचा हा सर्व कारभार मीरा रोड भागातील सात कॉल सेंटरमधून केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अमेरिकन आयआरएस (इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस)चे अधिकारी असल्याची बतावणी करून अमेरिकन नागरिकांची या टोळीने फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले होते.  
 
डेल्टा टॉवरच्या सातव्या मजल्यावर वेगवेगळ्या लोकांकडून सात कॉल सेंटर चालवले जात होते. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना व्हीओआयपी (व्हॉइस ओव्हर इंटरनेट पोर्टल) वरून कॉल केला जायचा. अमेरिकन इंटरनल रेव्हेन्यू ऑफिसर्स असल्याची बतावणी करीत अनेकांना टॅक्स चुकवल्याचे सांगून खटला दाखल करण्याचीही धमकी दिली जायची.
कॉल सेंटर घोटाळ्यातील कार होती विराट कोहलीच्या नावावर
बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना सुमारे ५०० कोटींचा गंडा घालणाऱ्या घोटाळ्यातील सूत्रधार सागर ऊर्फ शॅगी ठक्कर याने भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याकडून खरेदी केलेली तीन कोटींची ऑडी आर-८ ही कार आता ठाणे पोलिसांनी हरियाणातून हस्तगत केली होती. ही कार शॅगीने एका दलालाकडून खरेदी केली. कार खरेदीनंतर तिची कागदपत्रे त्याच्या नावावर करण्यासाठी पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे तो देण्यास टाळाटाळ करीत होता. या कारच्या खरेदीनंतर शॅगीने ती आपल्या अहमदाबादच्या प्रेयसीला भेट दिली होती.
 
सागर ठक्कर उर्फ शॅगीच पार्श्वभूमी
बोरिवलीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला शॅगी कालांतराने अहमदाबाद येथे स्थलांतरित झाला. तिथेच त्याने बनावट कॉल सेंटरची शक्कल लढवली. आधी अहमदाबादमध्ये या बनावट कॉल सेंटरचे जाळे उभे केल्यानंतर त्याने ठाणे जिल्ह्यातील भार्इंदर परिसरातील मीरा रोडमध्येही कॉल सेंटरचा हा पसारा उभा केला. 
 
५ ऑक्टोबर रोजी मीरा रोड परिसरातील १२ कॉल सेंटरवर धाड टाकून हा करोडो रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला.