शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

माता झाली वैरीण : पैशाच्या मोहापायी घातला नवजात मुलाच्या विक्रीचा घाट

By admin | Published: January 06, 2017 8:23 PM

नवजात बालकांची विक्री करणारे रॅकेट फरासखाना पोलिसांनी उध्वस्त केले असून तीन महिलांसह एका संस्थाचालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

 ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 6 - नवजात बालकांची विक्री करणारे रॅकेट फरासखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून, तीन महिलांसह एका संस्थाचालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून एक महिन्याच्या बालकाची सुटका करण्यात आली आहे. या बालकाची सव्वातीन लाख रुपयात विक्री केली जाणार होती. विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये आईचाही समावेश असल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत. लतिका सोमनाथ पाटील ( 23, डोंबिवली पुर्व, ठाणे), दीप्ती संजय खरात (30, रा. खडकवासला), आशा नाना अहिरे (27, रा. स्टेशन रोड, उल्हासनगर क्र. 4, ठाणे), केशव शंकर धेंडे (42, रा. राजीव गांधी सोसायटी, तरवडे वस्ती, महम्मद वाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, लतिका, दीप्ती आणि आशा बेरोजगार आहेत. तर केशव हा सासवडमध्ये निरंकार वसतीगृह नावाचे लहान मुलांसाठी वसतीगृह चालवतो. आरोपींनी पुण्यामधील एका व्यक्तीला लहान मुलाचा जन्म दाखला काढण्यासंदर्भात संपर्क साधला होता. याची कुणकुण फरासखाना पोलिसांना लागली होती. पोलीस नाईक शंकर कुंभार यांना खब-याने याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे, निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र चव्हाण, जयराम पायपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेंद्र जाधव, ज्ञानेश्वर देवकर, शंकर कुंभार, अमोल सरडे, हर्षल शिंदे, अमेय रसाळ, स्मिता सिताप, ईकबाल शेख, बापू खुटवड, संजय गायकवाड, बाबासाहेब गिरे, विनायक शिंदे, विकास बोऱ्हाडे, संदीप पाटील, सागर केकाण, मोनाली ननावरे यांनी कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालयाजवळ बुधवारी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास सापळा होता. पोलिसांनी बालकासह आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक महिन्याच्या बालकाची सुटका करण्यात आली आहे. लतिका ही या बालकाची आई असल्याच तपासात निष्पन्न झाले आहे. तिने या बाळाला 11 नोव्हेंबर 2016 रोजी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात जन्म दिल्याचे तपासात समोर आले आहे. तिला यापुर्वीच दोन मुले आहेत. दीप्ती आणि केशव यांची पूर्वीपासूनची ओळख आहे. याप्रकरणी बाल न्याय अधिनियम 2015 च्या कलम 81 नुसार गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने या चौघांना 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  लहान मुलांना जन्माला घालून त्यांची काही महिन्यातच विक्री करण्याचे आरोपींचे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. अनाथाश्रमामध्ये मुले दत्तक घेण्यासाठी प्रतिक्षायादीमध्ये असलेले किंवा मुले देण्यास अनाथाश्रमांनी नकार दिलेल्यांशी आरोपी संपर्क साधतात. त्यांना चढ्या भावामध्ये मुलांची विक्री केली जाते. ज्यांना मुले दत्तक घ्यायची असतात अशांना हेरुन हे रॅकेट आपले उखळ पांढरे करुन घेत होते. सासवड येथे  ‘निरंकार वसतीगृह’ चालवणारा केशव धेंडे हा मुलांच्या विक्रीसाठी ग्राहक शोधण्याचे आणि पैसे घेण्याचे काम करायचा. विक्री करता आणलेल्या मुलांचा जन्म दाखलाही तो काढून घेत होता. त्याला शासकीय अधिकारी, कर्मचारी सामिल आहेत का याचाही शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. लतिकाच्या बाळाचा सौदा सव्वातीन लाखांमध्ये ठरला होता. ही रक्कम तो स्वत: जाऊन आणणार होता. त्यातील अडीच लाख दीप्तीकडे देण्यात येणार होते. त्यातील दिड लाख रुपये दीप्ती आशाला देणार होती. तर दीड लाखांपैकी 80 हजार रुपये लतिकाला मिळणार होते.