शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
2
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
3
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
4
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
5
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
6
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
8
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
9
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
10
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
11
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
12
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
13
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
14
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
15
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
16
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
17
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
18
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
19
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
20
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!

मातंग समाजाचा चक्काजाम

By admin | Published: August 23, 2016 5:56 AM

अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मातंग समाजासाठी आयुष्यभर लढणाऱ्या या नेत्याच्या निधनाची बहुतांश माध्यमांनी दखलच न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या कार्यर्त्यांनी सोमवारी मुंबईकडे येणारी आणि मुंबईबाहेर जाणारी वाहतूक चार तास अडवली.मातंग समाजासाठी स्वत:ला वाहून घेणारे बाबासाहेब गोपले अनेक दिवसांपासून फुप्फुसाच्या विकाराने त्रस्त होते. घाटकोपर येथील हिंदू सभा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविले होते. मात्र रविवारी सकाळी ८ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यात बाबासाहेब गोपले यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन केले. तसेच मातंग समाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक आंदोलनेदेखील केली आहेत. (प्रतिनिधी)>वाहनांच्या रांगागोपले यांची अंत्ययात्रा मानखुर्दच्या साठेनगर येथील त्यांच्या राहत्या घरातून सोमवारी सकाळी ११ वाजता शिवाजी पार्कच्या दिशेने निघाली. दुपारी १ वाजता त्यांची अंत्ययात्रा चेंबूरच्या अण्णाभाऊ साठे उद्यानाजवळ पोहोचली. सुमननगर जंक्शनवर चक्काजाम केला. त्याचा फटका ठाणे आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला बसला. >शासकीय इतमामात अंत्यसंस्कार बाबासाहेब गोपले यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी ७ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले, समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, डॉ. प्रीतिश कुमार-जळगांवकर, राष्ट्रवादी सचिव प्रकाश भोसले, आरपीआयचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, डॉ. विजय मोरे, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पवार उपस्थित होते.