मुंबई : मेटतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘ई-एमबीए’ अभ्यासक्रमाने आता जागतिक भरारी घेतली आहे. संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर या अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. ब्रिटिश कोलंबिया, स्प्रॉट शॉ कॉलेज, कॅनडा, माऊंटबॅटेन इन्स्टिट्यूट, यूके, ग्लोबल स्कूल मॅनेजमेंट, क्वेस्टकनेक्ट (आॅस्टे्रलिया), टीएएफई क्वीन्सलॅण्ड, मोनॅश युनिव्हर्सिटी, यूकेतील चार्टर्ड अकाउंट्स संस्था आणि चार्टर्ड इन्शूरन्स इन्स्टिट्यूट या दिग्गज संस्थांचे या अभ्यासक्रमासाठी सहकार्य लाभत आहे. मार्केटिंग, एचआर, फायनान्स, डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम दिशादर्शक ठरत आहे. युरोप, अमेरिका आणि आॅस्टे्रलिया येथील करिअरच्या संधींचा विचार करता हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरत आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
‘मेट’च्या ‘ई-एमबीए’ची भरारी
By admin | Published: July 02, 2016 2:36 AM