नागपूर : राज्यातील माथाडी कामगारांवरील अन्याय दूर व्हावा, यासाठी महिनाभरात नवीन वेबपोर्टल सुरू करून कामगारांना ओळखपत्र देण्याची घोषणा कामगार मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात दिली.माथाडी कामगारांवर होत असलेल्या अन्यायासंदर्भात सदस्य नरेंद्र पाटील, किरण पावसकर, अनिल भोसले आदींनी नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. माथाडी कामगारांवर होणारा अन्याय दूर करून त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी केली. शेकापचे जयंत पाटील, शिवसेनेच्या नीलम गोºहे, पीरिपाचे प्रा. जोगेंद्र कवाडे आदींनी माथाडी कामगाराच्या समस्या मांडल्या. यावर कामगार कामगार मंत्री म्हणाले, केंद्र सरकारतर्फे आयोजित कामगारांच्या प्रश्नावरील बैठकीत राज्य सरकारने माथाडी कामगारांच्या समस्या मांडल्या. अन्य कामगारााच्या धर्तीवर त्यांनाही सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारने एक अभ्यास गट गठित केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील माथाडी क ायदा केंद्र सरकारने अमलात आणावा, अशी विनंती केली आहे.
माथाडी कामगारांना स्वतंत्र ओळखपत्र देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 4:44 AM