शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

पर्यटन हंगामासाठी माथेरानकर सज्ज

By admin | Published: November 02, 2016 2:14 AM

पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पर्यटन हंगाम चालू होणार आहे.

नेरळ : पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पर्यटन हंगाम चालू होणार आहे. त्यामुळे माथेरानमधील छोटे मोठे स्थानिक व्यावसायिक तसेच हॉटेलधारक पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत.नुकताच पावसाळा संपला असल्याने येथील वनराई हिरवीगार झाली असून, जणू पर्यटकांच्या स्वागतासाठी आतूर झालेली आहे. माथेरानच्या चारी बाजूच्या पायथ्याजवळील लहान-मोठ्या टेकड्या हिरव्यागार शालूने सजल्याने निसर्गाची पर्वणी ठरली आहे. हिवाळा चालू झाल्याने गुलाबी थंडीला सुरुवात ही येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागताची सुरुवात असणार आहे. माथेरानमधील छोट्यामोठ्या व्यावसायिकांनी आपआपली दुकाने सजवण्यास सुरुवात केली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रोशणाई, आकाशकंदील, डेकोरेशन करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयांना दिवाळीची सुटी आहे. त्यामुळे दिवाळीनंतरचा हा पहिलाच पर्यटन हंगाम आहे. माथेरानमधील पुढील आठ माहिन्यांची आर्थिक गणिते या हंगामावर अवलंबून असतात. त्यामुळे स्थानिकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवली आहे. स्थानिक व्यावसायिक तसेच हॉटेलधारकांकडून पर्यटकांना उत्तम प्रकारे सेवा कशी देण्यात येईल, याकडे लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. सध्या हॉटेल तसेच कॉटेजमध्ये आॅनलाइन बुकिंगची मोठ्या प्रमाणात चौकशी चालू आहे. यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा पर्यटकांची संख्या वाढेल आणि हंगामात चांगला व्यवसाय होईल, असा विश्वास स्थानिक व्यापाऱ्यांना आहे. (वार्ताहर)>घोड्यांसाठी पार्किंगमाथेरानची मिनीट्रेन सध्या बंद आहे. त्यामुळे पर्यटकांना शटल सेवेचा आधार घ्यावा लागतो. मात्र शटर सेवा निम्म्या मार्गासाठीच उपयोगी असल्याने पुढील प्रवास पायी अथवा घोडेस्वारीने करावा लागतो. अश्वपाल संघटनेने घोड्यांना उभे करण्यासाठी माथेरान नगर परिषदेकडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी अनेकदा केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास अश्वपालांची समस्या दूर होईल. पर्यटन हंगामात अधिकाधिक फायदा होईल, असे स्थानिक अश्वपालांचे म्हणणे आहे.