शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

माउलीभक्तांचा मेळा मल्हारनगरीत विसावला

By admin | Published: July 04, 2016 4:32 AM

जेजुरीच्या मल्हारी मार्तंड नगरीत बेलभंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करीत श्री संतशिरोमणी ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याने रविवारी सायंकाळी प्रवेश केला.

जेजुरी : महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या जेजुरीच्या मल्हारी मार्तंड नगरीत बेलभंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करीत श्री संतशिरोमणी ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याने रविवारी सायंकाळी प्रवेश केला. टाळमृदंगाच्या गजराने जेजुरीनगरी दुमदुमली. वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत गडकोटात ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ आणि ‘ज्ञानोबा माउली’च्या जयघोषात दर्शन घेतले.संत सोपानकाकांच्या सासवडनगरीत माउलींची नित्य महापूजा झाल्यानंतर पालखी सोहळ्याने सकाळी जेजुरीकडे प्रस्थान केले. बोरवकेमळा येथील न्याहारी, पुढे शिवरी येथील दुपारची विश्रांती, त्याचबरोबर साकुर्डे येथील विसावा उरकून सायंकाळी मजल-दरमजल करीत सोहळा जेजुरीत पोहोचला.तुकारामांच्या ओवीच्या सुरात दिंडीकरी वैष्णव झपझप पावले टाकीत खंडोबाची जेजुरी जवळ करीत होता. वारकरी नाचत-गात जेजुरीकडे येत होते. थंड व आल्हाददायक वातावरणातही रस्त्यात शेतकरीवर्गाने वारकऱ्यांसाठी आणलेली भाजी-भाकर वैष्णवांना मायेची ऊब देत होती. वरवंडमध्ये तुकोबारायांचे आगमनवरवंड : टाळ-मृदंगाच्या गजरात व विठुरायाच्या जयघोषात श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी येथे मोठ्या उत्साहात भरपावसात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ गावाच्या वेशीवर मोठ्या संख्येने हजर होते. ग्रामस्थांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. वरवंडमध्ये जून महिना अक्षरश: कोरडा गेल्याने शेतकरी चिंंतित होता; मात्र पालखीचे आगमन होताच पावसालाही सुरुवात झाली. या वेळी वारकरी नाचत-गात जेजुरीकडे येत होते.