लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आषाढीवारी अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याची पुण्यापर्यंतची पालखीची वाट बिकट झालेली आहे. पालखी महामार्ग रुंदीकरणाचे रखडलेले काम, बांधकामांचे अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, नियोजनशून्य काम, खोदलेले चर, पडलेला राडारोडा यामुळे वारकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे. आषाढीवारी येत्या १६ जूनपासून सुरू होणार आहे. शुक्रवारी देहूतून संतश्रेष्ठ तुकाराममहाराज आणि शनिवारी श्री क्षेत्र आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांची पालखी श्रीक्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. पावसाळा तोंडावर आला असला तरी रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत. पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी देहूतून पिंपरीपर्यंत आणि आळंदीतून विश्रांतवाडीपर्यंतची पालखीची वाट बिकट आहे. रस्ता रुंदीकरणाची कामे अपूर्ण असल्याने यंदा वारकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र महापालिका आणि जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. काम संथगतीने : ‘लोकमत’ने आळंदीतील देहूफाट्यापासून दिघीपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. विश्रांतवाडीतून दिघीपर्यंतचा रस्ता अपूर्ण आहे. रुंदीकरण रखडलेले आहे. तसेच दिघी गावठाणातही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. एकच लेन खुली ठेवली आहे. पुढे मॅगझिन चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. मॅगझिन चौकापासून साई मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच मधील रस्त्याचे काम सुरू असून बाजूने वाहने जाण्याची सोय केली आहे. काम संथगतीने : ‘लोकमत’ने आळंदीतील देहूफाट्यापासून दिघीपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. विश्रांतवाडीतून दिघीपर्यंतचा रस्ता अपूर्ण आहे. रुंदीकरण रखडलेले आहे. तसेच दिघी गावठाणातही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. एकच लेन खुली ठेवली आहे. पुढे मॅगझिन चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. मॅगझिन चौकापासून साई मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच मधील रस्त्याचे काम सुरू असून बाजूने वाहने जाण्याची सोय केली आहे. जीवघेण्या लोखंडी सळयाजाताना साई मंदिराच्या अलीकडे शंभर मीटरवरील रस्त्यावरच लोखंडी सळया बाहेर आलेल्या आहेत. उघड्या सळयांमुळे अपघात संभवतो. जीवघेण्या लोखंडी सळया येथे आहेत. तसेच येथे मोठ्या प्रमाणावर राडारोडा पडलेला आहे. पुढे साईमंदिरापासून वळणावर असलेल्या अडरपासचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला राडारोडा आणि खड्डे आहेत. त्यामुळे हा रस्ता धोक्याचा बनला आहे. दंडात्मक कारवाई करारस्त्यावर पडलेल्या सळया आणि राडारोडा रात्रीच्या वेळी दिसत नाही. त्यामुळे गाडी घसरून अपघात होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या अपघातांना जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी काम होणे अपेक्षित होते. मात्र, वाढीव खर्चाच्या आशेपायी ठेकेदाराने हे काम संथगतीने सुरू ठेवले आहे. पारदर्शक कारभाराचा टेंभा मिरविणारे भाजपाचे नेते आता कुठे गेले, असा सवाल उपस्थित करून वेळेवर काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही या भागातील नागरिकांनी केली आहे.
माऊलींची आषाढी वाट आणखी बिकट
By admin | Published: June 08, 2017 1:01 AM