पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात होणार आहे. सकाळी ८ला मोजणीस प्रारंभ होणार आहे. दहा मिनिटांत एक फेरी अशा मतमोजणीच्या २६ फेर्या होणार असून, दुपारी २पर्यंत निकाल जाहीर होऊ शकेल, असे मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांनी सांगितले. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक यंत्रावरील मतमोजणीच्या फेर्या सुरू होतील. ८४ टेबलांवर मतमोजणी होईल. एका टेबलावर एक पर्यवेक्षक, एक सहायक, एक सूक्ष्म निरीक्षक आणि एक शिपाई असेल. एका टेबलावर चार याप्रमाणे एकूण ८४ टेबलांवर ३३६ कर्मचार्यांची नेमणूक केली आहे. फेरीनिहाय मतमोजणीच्या कामासाठी स्वतंत्रपणे टेबलांवर त्या कर्मचार्यांची नेमणूक केली असून, त्यांच्या कामाची जबाबदारी समजून देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
मावळचा निकाल दुपारी दोनपर्यंत
By admin | Published: May 14, 2014 5:58 AM