मविआला कर्नाटकी बूस्टर; कर्नाटकच्या काँग्रेसी कशिद्याने भाजपवर चिंतनाची वेळ; काँग्रेसचे मनोधैर्य वाढले

By यदू जोशी | Published: May 14, 2023 06:24 AM2023-05-14T06:24:29+5:302023-05-14T06:25:47+5:30

राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नंतर नागपुरातील वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजप-शिंदे युती बॅकफूटवर जात असतानाच मविआतील तीन पक्षांमधले मतभेद उफाळून आले. 

Maviala Carnatic Booster Time to reflect on BJP by Karnataka Congress; The morale of Congress increased | मविआला कर्नाटकी बूस्टर; कर्नाटकच्या काँग्रेसी कशिद्याने भाजपवर चिंतनाची वेळ; काँग्रेसचे मनोधैर्य वाढले

मविआला कर्नाटकी बूस्टर; कर्नाटकच्या काँग्रेसी कशिद्याने भाजपवर चिंतनाची वेळ; काँग्रेसचे मनोधैर्य वाढले

googlenewsNext

 

मुंबई : कर्नाटकमधील काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला मोठे बळ मिळाले आहे. आपसातील मतभेद दूर सारून या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र राहिले तर, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजप-शिंदे युतीसमोर मोठे आव्हान उभे राहील, असे मानले जात आहे. 

राष्ट्रवादी, काँग्रेसशिवसेना या तीन पक्षांच्या छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नंतर नागपुरातील वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजप-शिंदे युती बॅकफूटवर जात असतानाच मविआतील तीन पक्षांमधले मतभेद उफाळून आले. 

एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याचे नाट्य घडले. त्यावरूनही राष्ट्रवादी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांनी एकमेकांवर काही आरोप केले. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी ठाकरे यांचे विश्वासू खा. संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले. मात्र, आता कर्नाटकच्या निकालानंतर मविआचे मनोबळ वाढेल व आपसातील वाद कमी करून भाजपविरोधात ठामपणे उभे राहण्याचा नेत्यांवरही दबाव येईल, असे म्हटले जाते.

कर्नाटकातील पराभवामुळे राज्यातील भाजपवरही चिंतनाची वेळ आणली आहे. लोकसभा निवडणुकीत किमान ४२ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निर्धारित केले आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) हे वेगवेगळे लढले होते. मात्र, त्यांच्या मतविभाजनाचा फायदा भाजपला उचलता आला नाही. महाराष्ट्रात भाजपविरोधात तीन प्रमुख पक्षांची वज्रमूठ आजतरी कायम आहे. त्यात काही फूट पडू शकेल का, यावर भाजप लक्ष केंद्रित करेल, असा अंदाज आहे. 

सरकारची कामगिरी उंचवावी लागेल 
आघाडीत बिघाडी होऊ नये, याची काळजी मविआला घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारचे अपयश हिंदुत्वाचा मुद्दा समोर करून झाकण्याचा प्रयत्न कर्नाटकात भाजपने केला. पण, त्यात यश आले नाही. महाराष्ट्रातही तसे करता येणार नाही; सरकारची कामगिरी उंचवावी लागेल, असा संदेशही या निकालाने भाजपला दिला आहे. 

भाजप-सेना युतीवर हल्ले तीव्र होतील
भाजपची कोंडी करण्याची संधीही या निकालाने मविआच्या नेत्यांना मिळवून दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजप-शिवसेना युतीवर विरोधकांचे हल्ले अधिक तीव्र होतील, असे मानले जात आहे. त्यासाठी या युतीला तयार राहावे लागणार आहे. 

Web Title: Maviala Carnatic Booster Time to reflect on BJP by Karnataka Congress; The morale of Congress increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.