शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

अत्यावश्यक २१ औषधांच्या कमाल किमती आता ५० टक्क्यांनी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 6:16 AM

अत्यावश्यक औषधे रुग्णाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत यासाठी ‘राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणा’कडून (एनपीपीए) औषधाच्या किमतींवर नियंत्रण आणले जाते. मात्र औषधांमधील मूळ घटकद्रव्ये, उत्पादन किमतींत वाढ झाल्याने औषधांच्या कमाल किमती वाढविण्याची मागणी कंपन्यांनी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २१ अत्यावश्यक औषधांच्या कमाल किमतींत ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने घेतला आहे. यात बीसीजी लस, हिवताप, कुष्ठरोग अशा आजारांवरील औषधांचा समावेश आहे.

अत्यावश्यक औषधे रुग्णाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत यासाठी ‘राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणा’कडून (एनपीपीए) औषधाच्या किमतींवर नियंत्रण आणले जाते. मात्र औषधांमधील मूळ घटकद्रव्ये, उत्पादन किमतींत वाढ झाल्याने औषधांच्या कमाल किमती वाढविण्याची मागणी कंपन्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर बाजारात या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून एनपीपीएने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविषयी राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने म्हटले आहे की, ही औषधे प्रथम श्रेणी उपचारांच्या श्रेणीत येतात. ही देशातील लोकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. औषधांची उत्पादन किंमत, मूळ घटकद्रव्यांमध्ये वाढ झाली. त्यामुळे औषधांच्या किमतींमध्येही वाढ व्हावी, अशी मागणी औषधनिर्मिती तसेच औषध विक्रेत्या कंपन्यांनी केली होती. औषध उत्पादन परवड नसल्याने हळूहळू औषधांचा तुटवडा बाजारात निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे आजारांवरील आवश्यक औषधे बाजारात उपलब्ध न होण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

एनपीपीएच्या बैठकांमधून केलेल्या औषधांचा प्रस्ताव नीती आयोगाच्या परवडणारी औषधे आणि आरोग्य उत्पादने या स्थायी समितीकडे पाठविण्यात आला. यावर समितीने औषधांच्या कमाल किमतीमध्ये एकाच वेळेस ५० टक्के वाढ करण्यास मान्यता दिली. त्यानुसार औषध किंमत नियंत्रण आदेश (डीपीसीओ) २०१३ चा संदर्भ देत औषधांच्या कमाल किमतीमध्ये अशा रीतीने एनपीपीएने प्रथमच वाढ केली आहे. या औषधांमध्ये बीसीजी लस, जीवनसत्त्व ड यासह हिवताप, कुष्ठरोग इत्यादी आजारांवरील अत्यावश्यक औषधांचा समावेश आहे.पुनर्विचार करणे गरजेचेजन आरोग्य अभियानाचे डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले की, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने सरसकट औषधांच्या किमतींत केलेली वाढ चुकीची आहे. यामुळे रुग्णांची हेळसांड होणार असून आरोग्यसेवेवरही याचा परिणाम होताना दिसेल. त्यामुळे याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे.