- अझहर शेख
नाशिक : (ऋषभदेव नगरीतून) - हिंसा केवळ हाताने होते असे नाही तर विचार, वाणीमधूनही होऊ शकते त्यामुळे आपण आपले विचार भगवान ऋषभदेव यांच्या मांगीतुंगीवरील विशाल मूर्तीप्रमाणे बनवून अहिंसा धर्माचे निष्ठने पालन करावे आणि निसर्गसंवर्धनाचा पुरेपूर प्रयत्न करावा असे प्रतिपादन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी पर्वताच्या पायथ्याशी आर्यिका ज्ञानमती माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान ऋषभदेव 108 फूट मूर्ती निर्माण कमिटी आयोजित विश्वशांती अहिंसा आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उदघाटक म्हणून रामनाथ कोविंद बोलत होते.
ऋषभदेवपूरम येथे झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे होते. व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद यांच्यासह गणिनी प्रमुख श्री ज्ञानमती माताजी, आर्यिकारत्न चंदनामती माताजी उपस्थित होते. यावेळी मूर्ती निर्माण कमिटीतर्फे भगवान ऋषभदेव आंतरराष्ट्रीय पुरस्कार मुरदाबाद येथील तीर्थांकर महावीर विश्व विद्यापीठचे कुलधिपती सुरेश जैन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. रुपये 11 लाख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याचवेळी कमितीतर्फे तयार करण्यात आलेल्या 'सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा' या ग्रंथाचे भगवान ऋषभ देव सर्वोच्च प्रतिमा ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. पहिली प्रत राष्ट्रपती रामनाथ कोविंद याना भेट देण्यात आली.
ऋषभदेवपूरम मांगीतुंगी येथे श्री दिगंबर जैन समाजाच्या वतीने आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद व त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांचे भगवान ऋषभदेव यांची प्रतिकृती भेट देऊन रवींद्रकिर्ती स्वामी यांनी स्वागत केले. दरम्यान, केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री व सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष भामरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, विश्वशांतीसाठी जैन धर्माच्या अहिंसाच्या सिद्धांताची गरज आहे. अहिंसाची सुटसुटीत व्याख्या जैन धर्माने केली आहे. विश्वाला अहिंसाची गरज आहे. विश्वात शांतता प्रस्थापित करण्याअगोदर आपल्या घरात आपल्याला शांती निर्माण करावी लागेल. हंकार हा विवादाचा मूळ कारण आहे. हे मूर्ती भारतीय संस्कृती साठी मोठी भेट आहे. हे समाजासाठी वरदान आहे. आदिवासी भागात या माध्यमातून परिसरात विकासगांग आणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे जातीने लक्ष द्यावे, असे डॉ. सुभाष भामरे म्हणाले. तर, मांगीतुंगी क्षेत्रात सगळे मंजूर विकासकामे पूर्णत्वास येणार. विश्व शांती भवन निर्मितीचा मार्गही लवकरच मोकळा होईल, तसेच राज्यातील 180 तालुक्यात दुष्काळ लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून सांगितले.