मुंबई : औरंगाबाद महापालिकेत भाजपा अवास्तव मागण्या करीत असल्याने अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करू, असा दावा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला. शिवसेनेकडे सध्या ४५ नगरसेवकांचे संख्याबळ असून, त्या भरवशावर महापौर बसवणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे २९ तर भाजपाचे २३ नगरसेवक विजयी झाले. येथील महापौरपद अडीच वर्षांकरिता भाजपाला देण्यावरून तिढा निर्माण झाला आहे. शिवसेनेने भाजपाला पाच वर्षांकरिता उपमहापौरपद देऊ केले असून, शेवटच्या वर्षी महापौरपद देण्याची तयारी दाखवली आहे. याखेरीज पाच वर्षांपैकी तीन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद भाजपाला देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र भाजपाला अडीच वर्षे महापौरपद हवे आहे. औरंगाबादमधील अपक्षांना सोबत घेऊन ४५ नगरसेवकांची जमवाजमव केल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. महापौरपदाकरिता शिवसेना, भाजपा व एमआयएमचे उमेदवार रिंगणात असतील तर मतविभाजनाचा लाभ शिवसेनेला होऊन महापौर निवडला जाईल. च्औरंगाबाद महापालिकेतील तिढा सोडवण्याकरिता पर्यावरणमंत्री रामदास कदम व भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची बैठक झाली. अडीच वर्षांकरिता महापौरपदाची मागणी सोडण्यास भाजपाने नकार दिला तेव्हा कदम यांनी याच न्यायाने राज्याचे मुख्यमंत्रिपदही अडीच वर्षांकरिता शिवसेनेला देण्याची मागणी केल्याचे कळते.च्भाजपाने शिवसेनेला कोणती खाती देऊ केली? महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे का? अशी प्रश्नांची सरबत्ती कदम यांनी दानवे यांच्यावर केल्याचे कळते.
औरंगाबादच्या महापौरपदावर सेनेचा दावा
By admin | Published: April 28, 2015 1:33 AM