शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

स्मारक हवे की महापौर बंगला?

By admin | Published: November 18, 2015 3:11 AM

दादर येथील महापौर निवासाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अत्यंत अयोग्य असून येथे स्मारक बनवू नये, अशी भूमिका घेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे

मुंबई : दादर येथील महापौर निवासाची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अत्यंत अयोग्य असून येथे स्मारक बनवू नये, अशी भूमिका घेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला लाटण्याचा हा प्रकार असल्याचा थेट आरोपच राज यांनी तातडीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केला. मंगळवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी महापौर निवासाच्या जागी बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली. त्यानंतर राज यांनी महापौर निवासातील प्रस्तावित स्मारकाला तीव्र विरोध दर्शविला. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईत अनेक पर्याय असताना शिवसेना विनाकारण वाद निर्माण करत असल्याची टीका राज यांनी केली. बाळासाहेबांचे स्मारक भव्यच व्हायला हवे. त्यासाठी महापौरांचे निवासस्थान अयोग्य ठिकाण आहे. महापालिकेत, राज्यात आणि केंद्रातही यांची सत्ता असताना यांना चांगली जागा का मिळत नाही? बिल्डरांना व राजकारण्यांना आरक्षित भूखंड दिले जातात. मग बाळासाहेबांसाठीच का जागा मिळत नाही, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. आज सत्ता आहे म्हणून महापौर निवासात स्मारक बांधत आहात, उद्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात किंवा राष्ट्रपती भवनात स्मारके उभारणार का? महापौर निवास हा मुंबईच्या प्रथम नागरिकासाठी आहे. येथे स्मारक झाल्यावर त्याला काय नाव देणार, महापौर बंगला की स्मारक, अशा प्रश्नांची सरबत्तीच राज यांनी केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेणारबाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईत अनेक पर्याय असताना वाद घातला जात आहे. दादरमध्येच म्युन्सिपल क्लबची मोठी जागा आहे. तेथे बाळासाहेबांचे स्मारक व्हावे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महापौर बंगल्यात होणाऱ्या स्मारकाला विरोध करणार असल्याचे राज यांनी सांगितले.