मुंबई : विरोधी पक्षांच्या आक्रमक पवित्र्यानंतरही नवनिर्वाचित महापौर स्नेहल आंबेकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत़ मात्र आपल्या या मागणीबाबत पक्षातून काय प्रतिक्रिया उमटत आहे यावर त्यांचे लक्ष आहे़ पक्षातील नेत्यांचे मत घेऊनच पुढचे पाऊल टाकण्याचे संकेत आज त्यांनी दिले़महापौरांनी लाल दिव्याची गाडी वापरू नये, असे पत्र राज्य सरकारने सर्व महापौरांना पाठविले आहे़ मात्र यापूर्वीचे महापौर सुनील प्रभू आणि विद्यमान महापौर आंबेकर या लाल दिव्याच्या गाडीवर पाणी सोडण्यास तयार नाहीत़ हा एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याने याविरोधात याचिका दाखल करण्याचा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे़मुंबई महापालिका वार्ताहर संघामार्फत आयोजित वार्तालापामध्ये महापौरांना याबाबत विचारले असता, विरोधी पक्षांना आपल्या महापौरांचा अभिमान नसेल़ मात्र हे पद प्रतिष्ठेचे असून, त्याला ‘ए प्लस’ दर्जा असल्याने लाल दिव्याची गाडी असावी, असे मत आंबेकर यांनी व्यक्त केले़ तरीही याबाबत गटनेत्यांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेईन, असे त्यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)
लाल दिव्याच्या गाडीवरच महापौर ठाम
By admin | Published: September 13, 2014 4:43 AM