ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २८ - नागपूर महानगरपालिका आणि अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्यावतीने महापौर करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन ३ ते १० जुलै दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेचा प्रारंभ प्राथमिक फेरीने रविवारी करण्यात आला. राज्यातील विविध एकांकिका स्पर्धांमधून निर्मितीचे पारितोषिक प्राप्त केलेल्या एकांकिकांना या स्पर्धेत प्रवेश देण्यात येतो. यात विदर्भातील एकूण १२ एकांकिका सादर करण्यात येणार आहे.
नागपूर-विदर्भात एकांकिका स्पर्धांची संख्या कमी झाल्याने विदर्भातील नवीन व चांगल्या दमदार कलाकृतींना, कलावंतांना संधी मिळावी म्हणून प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले. यात नागपूर- विदर्भातून एकूण २० संस्थांनी सहभाग घेतला. सर्वोत्कृष्टतेच्या निकषावर त्यातून मूळ स्पर्धेकरीता एकूण १२ एकांकिकांची निवड करण्यात आली. यासह राज्य स्तरातून एकूण ३० एकांकिकांनी स्पर्धेत प्रवेश घेतला आहे. प्राथमिक फेरीनंतर आता अंतिम फेरीत एकूण ४२ दर्जेदार एकांकिका नागपूरकरांना अनुभवता येणार आहे.
विदर्भातून निवडण्यात आलेल्या एकांकिका
१) देवरंजन बहुउद्देशीय संस्था - घुशी
२) पैंजण रंगभूमी - टष्ट्वेंटी टष्ट्वेंटी
३) बहुजन रंगभूमी - भारत अब बाकी है
४) नाट्य परिषद, नागपूर - अभंग
५) अॅम्यॅच्युअर आर्टिस्ट कंबाईन - सावधान एक योगकथा
६) शील कलासागर - आशील
७) भावामृत - १९४७ टू एके ४७
८) संजय भाकरे फाऊंडेशन - बाप हा बापच असतो
९) सहयोगी कलावंत, वर्धा - दृष्टी
१०) विनायकराव देशमुख हायस्कूल - सायंकाळच्या कविता
११) डॉ. राजेंद्रप्रसाद युवा कल्याणकारी संस्था उमरेड - फर्टिलायझर
१२) बसोली ग्रुप - कुळकर्णी व्हर्सेस देशपांडे