शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
3
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
4
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
5
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
6
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
7
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
8
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
9
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
10
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
11
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
12
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
13
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
14
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
15
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
16
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
17
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
18
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
19
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
20
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

मयूरेश्वर अभयारण्यात चिंकारा हरणांची संख्या वाढली

By admin | Published: May 24, 2016 6:45 PM

बारामती तालुक्यातील चिंकारा जातीच्या हरणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मयूरेश्वर अभयारण्यातील चिंकारा हरणांची संख्या वाढल्याचे बुद्ध पौर्णिमेला केलेल्या प्राणीगणनेत स्पष्ट झाले आहे

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 24- बारामती तालुक्यातील चिंकारा जातीच्या हरणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मयूरेश्वर अभयारण्यातील चिंकारा हरणांची संख्या वाढल्याचे बुद्ध पौर्णिमेला केलेल्या प्राणीगणनेत स्पष्ट झाले आहे. गतवर्षीच्या प्राणीगणनेत २५७ एवढी असणारी चिंकारांची संख्या या वेळी २७४ इतकी झाल्याची माहिती मयूरेश्वर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. आर. नागोसे यांनी दिली. या प्राणीगणनेत दुर्मिळ गेकुलिपर्ड जातीची पाल आढळून आली. 

बारामती तालुक्यातील काही भाग अवर्षणप्रवण असला तरी या भागात गवताची मैदाने आहेत. ही गवताची मैदानेच चिंकारा हरणांसाठी नैसर्गिक अधिवासाची ठिकाणे आहेत. त्यामुळे तालुक्यात मयूरेश्वर अभयारण्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर बारामती शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरात तांदुळवाडी गावच्या हद्दीतही दोन वर्षांपूर्वी चिंकारा वनउद्यान व सावळ गावच्या हद्दीत पक्षीनिरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. चिंकारा उद्यानामध्ये चिंकारा जातीच्या हरणांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर या उद्यानात औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये आवळा, कांचन, बेहडा, हिरडा, फणस, कोकम, करवंद, कण्हेर आदी विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे. मयूरेश्वर अभयारण्यात झालेल्या प्राणीगणनेत कुतवळवाडी दर्गा, बोअरवेल हातपंप, टॉवरशेजारी, सिमेंट टँक, नवीन वॉटर होल, झिरो पॉर्इंट, नवीन हापसा ६५ मिरे, निसर्ग परिचय केंद्र अशा आठ ठिकाणच्या पाणवठ्यांवर वनविभागाच्या ६ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह हंगामी वनमजुरांच्या मदतीने ही प्राणीगणना शनिवारी (दि. २१) बुद्ध पौर्णिमेदिवशी करण्यात आली. या प्रगणनेत १५ वन्यप्रेमींनी सहभाग घेतला होता. या प्रगणनेमध्ये २७४ चिंकारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १३२ माद्या, ११० नर, तर ३२ पाडसांचा समावेश आहे.चिंकारा हरणांची संख्या वाढण्यासाठी विविध उपाययोजनागतवर्षी झालेल्या प्रगणनेमध्ये २५७ चिंकारांची नोंद करण्यात आली होती. त्यामध्ये १३८ माद्या, ९२ नर, तर २७ पाडसांचा समावेश होता. गतवर्षीपेक्षा यावर्षी माद्यांची संख्या कमी नोंदवली गेली असली तरी नरांच्या व पाडसांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर्षीच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याच्या आणि पाण्याच्या कमतरतेतही वाढ चांगली असल्याचे स्पष्ट होत आहे. मयूरेश्वर अभयारण्यात चिंकारा हरणांची संख्या वाढण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. या प्रगणनेदरम्यान चिंकारांबरोबच या परिसरात १२ ससे, ३ खोकड, २ लांडगे, ३ तरस, १ रानडुक्कर, खार, गेकूलिपर्ड (पालीचा एक दुर्मिळ प्रकार) यांसारखे प्राणी आढळून आले. त्याचबरोबर मोर, कावळा, चिमणी, तितर, खाटिक, टिटवी, पाणकोंबडी, कोतवाल, भारद्वाज हे पक्षीही आढळून आल्याची माहिती नागोसे यांनी दिली.