पुणे : राज्यात यावर्षी गोवरचा उद्रेक झाला असून १४ हजार ८८० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर, आतापर्यंत ९५१ गोवरच्या रुग्णांचे निदान झाले नव्हता. आहे. मुंबईतील ११, भिवंडी तीन, ठाणे मनपा दोन, तर वसई विरारमधील एक अशा १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यापैकी केवळ एकाच बालकाने गोवरचा पहिला डोस घेतला होता. उरलेल्या १६ बालकांनी एकही डोस घेतलेला नव्हता.
राज्यातील मृत बालकांपैकी नऊ मुले तर आठ मुली आहेत. शून्य ते अकरा महिन्यातील चार, एक ते दोन वर्षे वयोगटातील १०, २ ते ५ वर्षातील २ आणि पाच वर्षापुढील एका बालकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू यावरून एक ते दोन वर्षातील बालकांचा मृत्यू सर्वाधिक असल्याचेही दिसून येते.
राज्यात सध्या गोवरच्या लसीचे जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्य स्तरावर मिळून १३ लाख ५३ हजार इतका साठा उपलब्ध आहे. यामध्ये प्रत्येक संशयित गोवरच्या रुग्णाला जीवनसत्व अ चे दोन डोस देण्यात येतात.