मुंबई : निवडणूक आयोगाच्या आदेशांचे पालन करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर मतदारयाद्या वेळोवेळी अद्ययावत कराव्यात; तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हणजे आदर्श उदाहरण (मॉडेल) ठरावे, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी येथे दिले. ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील उपसचिव अ. ना. वळवी या वेळी उपस्थित होते.
यंत्रणा कामाला
By admin | Published: February 26, 2015 2:09 AM